महाराष्ट्राच्या यशानंतर आता ” मिशन गोवा ” , लवकरच तिकडेही भूकंप घडवून आणू : खा . संजय राऊत यांचा दावा

शिवसेनेच्या पुढाकाराने राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर गोव्यातही लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राज्यात महाविआघाडीच्या स्थापनेमध्ये खा. संजय राऊत यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच त्यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे.
खा. राऊत हा दावा करताना म्हणाले कि , ‘गोव्यातही भाजपाने अनैतिक पायावर आधारलेले सरकार स्थापन केलेले आहे. त्यामुळे शिवसेनेचे महाराष्ट्रानंतर आता मिशन गोवा असेल. आताच माझे सुधीर ढवळीकरांशी बोलणे झाले आहे. गोवा फॉरवर्ड ब्लॉकचे प्रमुख विजय सरदेसाईंसह चार आमदार आमच्या संपर्कात आहेत,’ असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
गोव्यासह संपूर्ण देशभरातच भारतीय जनता पक्षाविरोधात शिवसेना राळ उठवणार असल्याचेही राऊत यांनी सांगितले. दरम्यान, येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहितीही संजय राऊत यांनी दिली.