Aurangabad Crime : कर्नाटक पोलिस महासंचालकांनी केले औरंगाबाद गुन्हेशाखेचे कौतूक, ‘मोस्ट वॉन्टेड’ आरोपीला केले अटक

औरंगाबाद | जगदीश कस्तुरे | बंगळूरु पोलिसांना आठ गुन्ह्यात वाॅंटेड असलेल्या उत्तरप्रदेशातील तीन पैकी एका आरोपीला बंगळूरु पोलिसांच्या हवाली केले. आठ गंभीर गुन्ह्यात वाॅंटेड असलेला आरोपी अचानक औरंगाबाद गुन्हेशाखेने समोर आणून उभा केल्यामुळे कर्नाटक चे पोलिस महासंचालक नीलमणी एन.राजूयांनी पोलिस आयुक्त चिरंजीवप्रसाद यांचे आणि गुन्हेशाखेचचे कौतूक केले अशी माहिती प्रसाद यांनी ‘महानायक ऑनलाईन’शी बोलतांना दिली.
सोनूसिंग, विष्णूसिंग आणि संदीप सत्तू सोनकर सर्व रा. उत्तरप्रदेश अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील विष्णूसिंग हा बंगळूरु पोलिसांच्या रेकाॅर्डवरचा आरोपी असून बंगळूरु मधे त्याने आठ गुन्हे केले आहेत.
गेल्या जुलै मधे औरंगाबादेत हर्सूल, कोकणवाडी आणि उस्मानपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ९ लाख ५० हजार रु .लंपास केले होते. तर जळगाव आणि सोलापूरातही तीन गुन्हे केल्याची कबुली आरोपींनी गुन्हे शाखेला दिली.या तिन्ही आरोपींना गुन्हेशाखेने कोल्हापूरातून अटक करुन आणले होते.या तिन्ही आरोपींना औरंगाबादेत तीन बॅग लिफ्टींग करण्याच्या प्रकरणात गुन्हेशाखेने पकडले.यातील विष्णूसिंगला बंगळूरु पोलिसांच्या हवाली केल्यामुळे कर्नाटक पोलिस महासंचालकांनी पोलिसआयुक्त चिरंजीवप्रसाद यांच्याजवळ फोनवरुन गुन्हेशाखेचे कौतूक केले.
यातील विष्णूसिंग उर्फ विशाल याच्या विरोधात बंगळूरु कोर्टाने विविध गुन्ह्यात वाॅरंट काढले होते. तर उत्तर प्रदेश पोलिसही वरील आरोपींच्या शोधात होते. म्हणून आरोपी विशाल ने एका आरोपी वकील मित्राच्या मदतीने बंगळूरु हायकोर्टाने विशाल उर्फ विष्णूसिंग याच्या विरोधातील सर्व वाॅरंट रद्द केले आहेत. कारण विशाल याला अपघातामुळैशारिरीक उपचारासाठी सौदी अरेबिययातील रियाध येथे जावे लागणार आहे. असा उल्लेख आदेशात होता. या बनावट अजब आदेशाचा पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी एपीआय जारवाल यांना शोध घ्यायला लावला. त्यामधे असे खोटे आदेश उत्तरप्रदेश पोलिसांना पाठवल्याचे गुन्हे शाखेने उघडकीस आणले आहे. विष्णूसिंग हा बंगळूरु च्या मध्यवर्ती कारागृहात २०१३ ते २०१६ या काळात अटक होता. त्त्यावेळी त्याच्या सोबत केरळ मधील एक वकीलही दुसर्या गुन्ह्यात अटक होता. बंगळूरु कारागृहातच विष्णूसिंग आणि वकील आरोपीची ओळंख झाली होती. व बोगस आॅर्डर तयार करण्याचा प्लान यामुळे विशाल उर्फ विष्णूसिंग ने यशस्वी केला. या प्रकरणात हर्सूल पोलिस ठाण्यात बनावट कोर्ट आॅर्डर तयार करण्याचा आणखी एक गुन्हा दाखल आहे.
या तपासानंतर पोलिसआयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या आदेशावरुन पोलिस निरीक्षक मधुकर सावंत व एपीआय अजबसिंग जारवाल यांनी आरोपी विष्णूसिंग उर्फ विशाल ला बंगळूरु पोलिसांच्या हवाली केले आहे.तर सोनूसिंग आणि संदीप सोनकर हे हर्सूल कारागृहात शिक्षा भोगंत आहेत. मध्यंतरी सोलापूर आणि जळगाव पोलिसांनी सोनूसिंग आणि सोनकर या दोघांना तपासासाठी नेऊन पु न्हा हर्सूल कारागृहात आणून सोडले.वरील कारवाईश्रेय पोलिसआयुक्त चिरंजीवप्रसाद यांनी पोलिस निरीक्षक मधुकर सावंत आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल यांना दिल्याचे कर्नाटक पोलिस महासंचालकांना धन्यवाद देतांना म्हटले.