Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्राचे राजकारण : अजित पवार सिल्व्हर ओकवर येऊन पवारांना भेटले

Advertisements
Advertisements
Spread the love

महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळेच वळण देणारे राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार अखेर नाट्यमय घडामोडींनंतर  उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर तब्बल ९ तासांनी अजित पवार यांनी बंधू श्रीनिवास पवार यांच्या घरातून बाहेर पडत थेटसिल्व्हर ओकला जाऊन काकांची  अर्थात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. दरम्यान अजित पवार त्यांच्या घरी पोहोचताच त्यांची बहीण सुप्रिया सुळे यांनी दारातच अजितदादांचं स्वागत करून त्यांना घरात घेतले.

Advertisements

चार दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर नेपियन्सी रोडवरील श्रीनिवास पवार यांच्या घरातून निघालेले अजित पवार थेट शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी दाखल झाले. रात्री सव्वानऊच्या सुमारास अजित पवार तिथे पोहचले. कारमधून उतरून माध्यमांना टाळत धावतच अजितदादांनी सिल्व्हर ओकमध्ये प्रवेश केला. पवारांच्या घराचा दरवाजा उघडाच होता. तिथे सुप्रिया यांनी त्यांचं स्वागत केलं. अजितदादा घरात जाताच दरवाजा बंद करून घेण्यात आला.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!