Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Politics of Maharashtra : कोण काय म्हणाले ? : उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्यास संमती : खा. संजय राऊत

Advertisements
Advertisements
Spread the love

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नाव पुढे आल्यानंतर  मुख्यमंत्री होण्यासाठीचा मित्र पक्षांचा आग्रह उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला असल्याची माहिती  शिवसेना नेते संजय राऊत यांनी तशी माहिती माध्यमांना दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री होणारे उद्धव हे ठाकरे घराण्यातील पहिलेच ‘ठाकरे’ असणार आहेत.

Advertisements

नेहरु सेंटरमध्ये पार पडलेल्या तिन्ही पक्षांच्या  बैठकीत अनेक बाबींवर चर्चा झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे नेते  शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रमुख नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि अहमद पटेल यांची उपस्थिती होती. या बैठकीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद स्वीकारावं हा प्रस्ताव मांडण्यात आला. हा प्रस्ताव त्यांनी स्वीकारल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिली. राष्ट्रवादीचे नेते  शरद पवार यांनी  उद्धव ठाकरेंच्याच नावाला आपली पसंती दिली होती. काँग्रेस नेतेही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यास तयार आहेत. शिवसेनेच्या आमदारांनीही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील हे स्पष्ट केलं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या बैठकीत यासंदर्भातला प्रस्ताव मांडण्यात आला होता. हा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी स्वीकारला असल्याचं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

Advertisements
Advertisements

खासदार संजय राऊत यांनी हा दावा केल्याने उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील यावर शिक्कामोर्तब झालं आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार हे संजय राऊत यांनी आत्तापर्यंत दररोज झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. मात्र शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हे स्पष्ट झालेलं नव्हतं. मुख्यमंत्रीपदासाठी प्रारंभी आदित्य ठाकरे , उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई यांची नावे चर्चेत होती त्यानंतर माध्यमांनी संजय राऊत यांचेही नाव या यादीत जोडून टाकले. आता अखेर उद्धव ठाकरे यांनी प्रस्तावाला मान्यता दिली असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!