Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Politics of Maharashtra Live Current Updates : शिवसेनेकडे पाच वर्षाचे मुख्यमंत्रीपद ? असे काहीही ठरलेले नाही, अजून बरीच चर्चा होणे बाकी आहे, वेळ लागेल : छगन भुजबळ

Spread the love

आजच्या महत्त्वाच्या अपडेट्स

– शपथविधी झाल्याशिवाय शरद पवारांवर विश्र्वास बसत नाही, शिवसेनेमुळे राष्ट्रवादी सोबत आलो : आ. बच्चू कडू

शिवसेनेच्या पाच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदावर अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही : भुजबळ

– शिवसेनेकडे पाच वर्षाचे मुख्यमंत्रिपद व राहील यासंबंधी कुठलीही चर्चा झाली नसून अजून बरीच चर्चा होणे बाकी आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितल्यामुळे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातील सत्तावाटपाचा पेच अद्याप सुटला नसल्याचे दिसून येत आहे.

देवेंद्र फडणवीस वगळता मला मोदी-शहांचा एकही फोन नाही : उद्धव ठाकरे

मातोश्रीवरील शिवसेनेच्या आमदारांची  बैठक संपली असून या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं.

उद्धव ठाकरे यांनी  राज्यात सत्तास्थापनेचा जो पेच निर्माण झाला आहे त्यासाठी भाजपाच जबाबदार असल्याचं यावेळी सांगितलं. तसंच जेव्हापासून पेच निर्माण झाला आहे तेव्हापासून देवेंद्र फडणवीस वगळता नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांचा फोनही आला नसल्याची माहिती उद्दव ठाकरे यांनी आमदारांना दिली.

दरम्यान शिवसेनेच्या सर्व आमदारांना मुंबईत एकत्र राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. सर्व आमदार मुंबईतच एकत्र राहणार असल्याची माहिती आमदार सुनील प्रभू यांनी दिली आहे. याआधी आमदारांनी जयपूरला हलवलं जाणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र सुनील प्रभू यांनी हे चुकीचं वृत्त असल्याचं सांगत सर्व आमदार मुंबईतच थांबणार असल्याची माहिती दिली.

– मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक चालू असून या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारावी असा आग्रह शिवसेना आमदारांनी धरला आहे दुसऱ्या क्रमांकावर गटनेते एकनाथ शिंदे यांचे नाव आहे.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर पुन्हा क्षेपणास्त्र डागले. त्यांनी केलेली वक्त्व्ये अशी आहेत.

– उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व करावं अशी महाराष्ट्राची इच्छा आहे.

– आता कुणी इंद्राचं आसन जरी दिलं तरी आम्हाला नको.

– महाराष्ट्राला मजबूत, कणखर मुख्यमंत्री मिळेल.

– नव्या ऑफर घेण्याची ही वेळ नाही. आता सेल संपलेला आहे.

-पाच वर्षे शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल यावर तिन्ही पक्षांचं एकमत आहे.

-तो क्षण आता आला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर शिवसैनिक विराजमान होणार आहे.

– राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर दाखल

भाजपपासून फारकत घेतल्यानंतर शिवसेनेची नव्या मित्र पक्षांची आघाडी आता सत्ता स्थापनेच्या अंतिम टप्प्यात असून आज या प्रयत्नांवर तिनही पक्षांच्या नेत्यांकडून अखेरचा हात फिरवला जाईल असे सांगण्यात येत आहे.
अर्थात हे सगळं सुरू असतानाच भाजपनं आता शिवसेनेला अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याचे वृत्त आहे. मात्रर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या वृत्ताचे खंडण केले आहे.
भाजपच्या या वरातीमागून आलेल्या घोड्यावर शिवसेनेला काहीही स्वारस्य नसणार हे उघड असले तरी काॅंग्रेस-राष्ट्रवादीला आपल्या हालचाली अधिक तीव्र कराव्या लागतील हे मात्र नक्की.

आजच्या महत्त्वाच्या अपडेट्स

– मातोश्रीवरील बैठक संपल्यानंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांना जयपूर येथे हलविण्यात येत असल्याचे वृत्त आहे. त्यासाठीच आमदारांना पाच दिवसांचे कपडे, आधार कार्ड, पॅन कार्ड घेऊन येण्याचे फर्मान काढण्यात आले होते.

– राष्ट्रवादीचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची घटक पक्षांसोबत बैठक होत आहे.

– काॅंग्रेस विधिमंडळ पक्षाचा नेता ठरविण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांची आज मुंबईत बैठक होत आहे.

– शिवसेना आमदारांची आज मातोश्रीवर बैठक होत आहे.
भाजपनं शिवसेनला अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिल्याच्या वृत्ताचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी खंडण केलं आहे.

– मुख्यमंत्रिपद, उपमुख्यमंत्रिपदावर आज अंतिम चर्चा होण्याची शक्यता.

– सर्व निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर आघाडीकडून आज सत्ता स्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!