Bad News : पाण्याच्या खड्यात बुडून १२ वर्षीय मुलाचा अंत

औरंंंगाबाद : साचलेल्या पाण्याच्या खड्यात खेळण्यासाठी गेलेल्या आदीत्य दत्ता शेजवळ (वय १२, रा.ब्रिजवाडी) या मुलाचा पाण्यात बुडून करून अंत झाला. ही घटना २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. आदीत्य शेजवळ हा ब्रिजवाडी परिसरातील साचलेल्या पाण्याच्या खड्यात खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी अचानकपणे पाय घसरून तो पाण्यात पडून बुडाला होता. या घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी दाखल झालेल्या एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याच्या कर्मचाNयांनी आदीत्य शेजवळ याला पाण्याबाहेर काढुन उपचारासाठी घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस नाईक शेख अर्शद करीत आहेत.