Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

देशाच्या संरक्षण समितीवर साध्वी प्रज्ञा यांची नियुक्ती , काँग्रेसकडून भाजपवर टीकास्त्र

Advertisements
Advertisements
Spread the love

मालेगाव स्फोट प्रकरणात आरोपी असलेल्या तसेच भोपाळमधील खासदार असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संरक्षण मंत्रालयाच्या समितीवर नियुक्ती करण्यात आल्याने काँग्रेसने भाजपवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस नेते जयवीर शेरगील यांनी एक ट्विट करून भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

Advertisements

मालेगाव स्फोटातील आरोपी आणि भोपाळमधून भाजपा खासदार असणाऱ्या प्रज्ञा ठाकूर यांना संरक्षण मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीत स्थान देण्यात आलं आहे. या समितीत एकूण २१ सदस्य आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या समितीचे प्रमुख आहेत. वादग्रस्त असणाऱ्या प्रज्ञा ठाकूर यांना समितीत सहभागी केल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Advertisements
Advertisements

काँग्रेसचे नेते जयवीर शेरगील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , प्रज्ञा सिंह ठाकूर यांची संरक्षण मंत्रालयाच्या समितीवर नियुक्ती करून भाजप सरकारने राष्ट्रीयत्वाचे नवीन मॉडेल देशाला दिले आहे. बॉम्ब स्फोटात आरोपी असलेल्या व्यक्तीला संरक्षण मंत्रालयाच्या समितीत सहभागी करून घेतले आहे. चिंता करण्याचे काहीही कारण नाही. भारत माता की जय.  काही मिहिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साध्वीच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनातून माफ करणार नाही, असे म्हटले होते. याची आठवण करून देत जयवीर शेरगील म्हणाले, आता हे स्पष्ट आहे की, नथूराम गोडसे भक्तांचे अच्छे दिन आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!