Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आई , बहीण आणि भावजयीवर बलात्कार करणाऱ्या दारुड्या मुलाची अखेर कुटुंबीयांनी केली हत्या

Advertisements
Advertisements
Spread the love

मध्य प्रदेशातील दातिया येथे खळबळजनक घटना घडली असून  दारुच्या नशेत आई, बहिण आणि भावाच्या पत्नीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या मुलाची कुटुंबाकडूनच हत्या करण्यात आल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी हत्येप्रकरणी कुटुंबातील चार सदस्यांना अटक केली आहे. पोलिसांना १२ नोव्हेंबर रोजी २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह गोपालदास हिल परिसरात आढळला होता. यासंबंधी कुटुंबाकडे चौकशी केली असता त्यांनी हत्या केली असल्याची कबुली दिली अशी माहिती पोलिस उपविभागीय अधिकारी गीता भारद्वाज यांनी दिली आहे.

Advertisements

गीता भारद्वाज यांनी सांगितल्यानुसार “१२ नोव्हेंबर रोजी आम्हाला मृतदेह आढळला. शवविच्छेदन केलं असता हत्या करण्यात आली असल्याचं उघड झालं. मृतदेहाची ओळख पटली असता त्याला दारुचं व्यसन होतं आणि कुटुंबीय त्याला त्रासले होते अशी माहिती समोर आली. कुटुंबाकडे चौकशी केली असता त्यांनी आई, बहिण आणि वहिनीवर बलात्कार केला म्हणून त्याची हत्या केली असल्याची कबुली दिली”.

Advertisements
Advertisements

मृताच्या वडिलांनी सांगितल्यानुसार, “११ नोव्हेंबर रोजी मुलगा दारुच्या नशेत घरी आला आणि भावाच्या पत्नीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्याने याआधीही अनेकदा असा प्रयत्न केला होता. म्हणूनच आम्ही त्याची हत्या केली आणि मृतदेह गोपालदास हिल येथे टाकला”. पोलिसांनी मृताचे वडील, पत्नी, भाऊ आणि वहिनी यांना अटक केली आहे. चौघांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!