राज्यसभा : २५० व्या सत्रानिमित्त पंतप्रधानांनी केला सदस्यांचा गौरव , राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजू जनता दलाचे विशेष कौतुक

राज्यसभेच्या २५० सत्रानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेच्या आज संबोधित केले. ते म्हणाले कि , मागील २५० सत्रांमध्ये राज्यसभेने अनेक स्थित्यंतरं पाहिली, राज्यसभेची २५० सत्रं म्हणजे एक विचारधारा आहे . या सभागृहात अनेक सदस्यांनी इतिहास घडवला आहे, इतिहास घडताना पाहिला आहे. अनेक दिग्गज सदस्यांनी या सदनाचे नेतृत्त्व केलं आहे ही बाबही अभिमानास्पद आहे. आत्तापर्यंतचा राज्यसभेचा प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी आहे असं मोदी म्हणाले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर , डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सभागृहातील योदानाचाही नरेंद्र मोदी यांनी गौरव केला. त म्हणाले कि , राज्यसभेच्या गौरवशाली प्रवासात मला सहभागी होता आलं याचा अभिमान वाटतो असंही मोदींनी त्यांच्या भाषणात स्पष्ट केलं. स्थायीभाव आणि वैविध्य हे राज्यसभेची वैशिष्ट्यं आहेत. अशी राज्यसभा कधीही भंग होणार नाही असंही ते म्हणाले. भारतातली एकता कायमच राज्यसभेत पाहण्यास मिळाली असंही त्यांनी म्हटलं आहे. राज्यसभा ही देशाची विकासयात्रा आहे,
मी खासकरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजू जनता दल या पक्षांचं कौतुक करेन. त्यांनी कायमच या सभागृहाची परंपरा पाळली. राज्यसभेच्या अध्यक्षांसमोर थेट उतरुन आंदोलन केलं नाही ही बाब विशेष आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. थेट अध्यक्षांसमोर न जाताही या दोन्ही पक्षांनी अत्यंत टोकदारपणे त्यांची बाजू सभागृहात मांडली हे महत्त्वाचं आहे. इतर पक्षांनी त्यांच्याकडून ही शिकवण घेतली पाहिजे असाही सल्ला मोदींनी इतर पक्षांना दिला.