महाराष्ट्राचे राजकारण : रामदास आठवले यांची चिंता , पंतप्रधान नरेंद्र मोदी ,अमित शहा आणि शिवसेना नेते खा. विनायक राऊत…

भाजप -सेनेच्या वाद -विवादानंतर राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या हालचाली प्रगतीपथावर असताना केंद्रिय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची भाजपनेच महाराष्ट्रात सरकार बनवावे यासाठी मोदी -शहा यांना गळ घातली आहे . त्यावर बोलताना आठवले म्हणाले कि , “राज्यातील सरकार स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी आपण भाजपाध्यक्ष अमित शाह यांना लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावर काळजी करू नका. असे सांगितले असून राज्यात भाजपा-शिवसेनाच सरकार स्थापन करेल, असं शाह यांनी सांगितल्याचा दावा केला आहे.
Union Minister Ramdas Athawale: I told Amit bhai (BJP President Amit Shah) that if he mediates then a way can be found out to which he (Amit Shah) replied "don't worry, everything will be fine. BJP & Shiv Sena will come together to form government". #Maharashtra pic.twitter.com/JMIPnQJsuM
— ANI (@ANI) November 17, 2019
दरम्यान विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीला सरकार स्थापनेचा जनादेश मिळाला होता. मात्र, मुख्यमंत्रीपदासह सत्तेच समसमान वाटप करा, अशी मागणी शिवसेनेनं केली होती. त्यावर मुख्यमंत्रीपदाबद्दल कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका भाजपानं घेतली होती. त्यामुळे दोन्ही पक्षातील संवाद पूर्णपणे थांबला होता. त्यानंतर अनेक आरोप -प्रत्यारोपानंतर शिवसेनेनं भाजपासोबत न जाण्याचा निर्णय घेतला . त्यामुळे बहुमताचा आकडा नसल्यानं भाजपानं सरकार स्थापन करण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही बहुमताअभावी सत्तास्थापनेचा दावा करता आला नाही. परिणामी सध्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे. तर दुसरीकडं भाजपाला बाजूला ठेवून सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये बोलणी सुरू आहे. तिन्ही पक्षाचा समान कार्यक्रमही ठरला आहे. सध्या पक्षश्रेष्ठींच्या होकारासाठी सगळं थांबलं आहे.
अशा परिस्थितीतही भाजपने राज्यात सरकार स्थापन करावे यासाठी आठवले यांची शहा आणि मोदींकडे मनधरणी चालूच आहे. आज संसदेत असे झाले कि , उद्यापासून सुरु होणाऱ्या संसदीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारांची बैठक घेतली यावेळी आठवले यांनी प्रारंभीच शिवसेनेचे नेते खा. विनायक राऊत यांच्याकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधून म्हटले कि , पंतप्रधान महोदय महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेसंदर्भात काही तरी निर्णय घ्या. त्यावर पंतप्रधान मोदी इतकेच म्हणाले कि , आज बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे . ते महान नेते होते. आणि ते आठवले यांच्या वक्तव्यावर कुठलेही भाष्य न करता पुढे निघून गेले.
त्यानंतर शिवसेना नेते अमित शहा यांच्याकडे पाहून विनायक राऊत म्हणाले कि , “सरकार बनाना तो अमित जी के हाथ में है”. त्यावर अमित शहा यांनी काहीही न बोलता स्मित हास्य केले. चर्चेचा हाच धागा धरून आठवले म्हणाले कि , “अमित भाई आप कोशिश करेंगे तो महाराष्ट्र में सरकार बन जाएगी”. आठवलेंच्या या टिप्पणीवर बोलताना अमित शहा इतकेच म्हणाले कि , “आप चिंता मत कीजिए सब ठीक होगा”.
दरम्यान या विषयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्याचे टाळले असले तरी रामदास आठवले यांना अमित शहा यांनी चिंता न करण्याचा सल्ला दिल्याने आठवले काहीसे तणावमुक्त झाले.