महाराष्ट्राचे राजकारण : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केले शिवसेनेची चिंता वाढविणारे विधान….

भाजपने सरकार बनविण्यास असमर्थता व्यक्त केल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याकडूनही सरकार स्थापनेचे दावे वेळेत न केल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट सुरु झाली . दरम्यान शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने सरकार बनविण्याच्या दृष्टीने तिन्हीही पक्षांची लगबग माध्यमांनी दाखवली . तिन्हीही पक्षांच्या नेत्यांनी किमान समान कार्यक्रमही तयार केला , याच विश्वासावर शिवसेनेने तडकाफडकी केंद्रातील मंत्रीपद सोडून एन डी ए मधून बाहेर पडून संसदेत विरोधी बाकावर बसण्याची तयारी केली . आज संसदीय कामकाज मंत्री प्रळसड जोशी यांनी शिवसेनेला NDAमधून बाहेर काढल्याचे जाहीरही केले त्यातच राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेची चिंता वाढवणारे वक्तव्य केले आहे .
बारामतीमध्ये पत्रकारांनी नव्या सरकारबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले कि , काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं अजुन काहीही ठरलेलं नाही. माध्यमांनी उगाच नको त्या चर्चा करून नये. आमदार फुटण्याच्या बातम्यांवर बोलताना ते पुढे म्हणाले कि , अशा बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. अनेकजण पहिल्यांदाच निवडून आलेले असल्याने फुाटाफूट होणार नाही. काहींनी पक्ष सोडल्यावर काय निकाल लागतो हे साताऱ्यात सगळ्यांना दिसलंय. त्यामुळे आता कुणी असं करणार नाही. शिवाय कर्नाटकचा निकाल काय लागला हेही जनतेने पाहिले आहे. जर कुठल्या पक्षाने कुठल्या पक्षाचे आमदार फोडले तर इतर तिन्ही पक्ष एकत्र येवून त्यांचा पाडाव करतील.
शिवसेना -राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात सत्तेचा काही फॉर्म्युला ठरलाया बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. अद्याप काहीही ठरलेलं नाही. याबद्दल त्या त्या पक्षाचे सर्वोच्च नेते निर्णय घेत नाहीत तोपर्यंत या सगळ्या वावड्याच आहेत. आता सोनिया गांधी आणि पवारसाहेबांची भेट होईल. त्यानंतर सगळे चित्र स्पष्ट होईल.
भाजप नेत्यांच्या वक्तव्याबद्दल बोलताना ते म्हणाले कि , त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न. आज त्यांच्याकडे बहुमत असताना त्यांनी सत्ता स्थापन केली नाही. आम्ही विरोधी पक्षात बसण्याच्या मानसिकतेत होतो. मात्र आता राष्ट्रपती राजवट लागल्यानंतर सत्तेबाबत मार्ग काढता येतोय का याबद्दल सगळेच प्रयत्न करतायत. जोपर्यंत १४५ च्या पुढे आकडा होत नाही तोपर्यंत गोड बातमी येणार नाही. आणि आपल्याला राष्ट्रपती राजवटीतच आपल्याला रहावं लागेल.