सत्ता समीकरणासाठी अखेर तिन्ही पक्ष एकत्र !

राज्यातल्या सत्ता समीकरणासाठी अखेर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्रितपणे ठोस पावले टाकायला सुरुवात केली असून या तिन्ही पक्षांची पहिली संयुक्त बैठक आज मुंबईत सुरू झाली आहे. या बैठकीत किमान समान कार्यक्रम व सत्ता वाटप यावर चर्चा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
Mumbai: Congress, Shiv Sena and NCP held a joint meeting to discuss issues between them for Common Minimum Programme, today. #Maharashtra pic.twitter.com/Fd6QYu6x8i
— ANI (@ANI) November 14, 2019
शिवसेनेकडून विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रवक्ते नवाब मलिक, काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, माणिकराव ठाकरे हे नेते या बैठकीला उपस्थित आहेत.
काँग्रेस आघाडी आणि शिवसेनेच्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने विचारात घेऊन त्या माध्यमातून किमान समान कार्यक्रम निश्चित करण्यावर या बैठकीत खल केला जात आहे. या तिन्ही पक्षांची ही पहिलीच संयुक्त बैठक असून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही बैठक होत असल्याची दृष्ये समोर आली आहेत.