महाराष्ट्राचे राजकारण : देवेंद्र फडणवीस यांनी बदलली पाटी , काय लिहिले पहा…

भाजप नेते मग ते स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी असोत कि , राज्याचे मावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय आहेत .
युतीला बहुमत मिळाल्यानंतरही भाजप-सेनेत मतभेदांमुळे भाजपाला सरकार स्थापन करता आलं नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू होईपर्यंतच्या काळात त्यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्रिपद आले. आपले मुख्यमंत्रीपद जाताच फडणवीस यांनी सोशल मीडियावरील आपल्या अकौंट वरील मुख्यमंत्रीपदाही पाटी हटवून “काळजीवाहू मुख्यमंत्री ” असे लिहिण्यात आले होते मात्र जेंव्हा कुठल्याही पक्षाला सरकार स्थापन न करता आल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागली आणि देवेंद्र फडणवीस यांचे काळजीवाहू पदही गेले
हा बदल होताच त्यांनी पुन्हा आपल्या अकौंट वर केवळ ” महाराष्ट्र सेवक” असा बदल केला आहे.