जालना : पत्रकार किरणकुमार जाधव यांचे आकस्मिक निधन

किरणकुमार साळुबाजी जाधव एक मनमिळावू आणि दांडगा जनसंपर्क असणारा हाडाचा पत्रकार. शेवट पर्यंत जीवनाशी संघर्ष करीतच हरपला . त्याचे शालेय शिक्षण सरस्वती भुवन प्रशाला , पदवी मत्सोदरी कालेज मस्तगड जालना येथे तर पदव्युत्तर शिक्षण डॉ .बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे पूर्ण केले . त्याने पत्रकारितेत बी.जे . एम . जे . केल्यानंतर जालन्यातील नामांकित दैनिकात दै.लोकमत, दै.पार्श्वभूमी , दै.महानायक व मराठीतील पहिली वृत्तवाहिनी झी २४ तास मधे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केले . अलिकडच्या काळात TV9हिंदी वृत्तवाहिनीशी जुडलेले होते .एक बोलका पत्रकार ज्याची लेखणीला मजबूत विचारांची धार होती .आपल्या लेखणीतून शहराचा आणि जिल्ह्याचा कायापालट करण्याचा संकल्पच जणू या तरुण पत्रकाराने केला होता .
अलीकडच्या काळात विमनस्क अवस्थेत किरणकुमार जगत होता त्यांच्या हयातीत त्याने आपले सर्व कर्तव्ये बिनभोभाट लिलया पार केली .पत्नीलाही खूप शिकविले शिक्षीका बनविले. सध्या त्यांच्या पत्नी जि.प.शाळेत जालना तालुक्यात कार्यरत आहेत. चांगल्या कवयित्री व स्तंभलेखिका आहेत .एक मुलगा व मुलगी ऊच्चशिक्षण घेऊन स्पर्धापरिक्षांची तयारी करीत आहेत. त्यांच्या पश्चात आई शकुंतलाबाई ,भाऊ संतोषकुमार व जुळा भाऊ पत्रकार सुबोधकुमार , तीन पुतण्या व तीन पुतणे भावजय असा मोठा परिवार आहे . त्यांच्या अशा अकाली जाण्याने आधुनिक आणि परिवर्तनवादी विचारांचा , शब्दांची जाण असणारा पत्रकार नियतीने हिरावला आहे . दुपारी त्यांच्या पार्थिवावर रामतीर्थ समशानभूमीत असण्यतसंस्कार करण्यात आले.
महानायक परिवाराची किरणकुमार जाधव यास भावपूर्परून श्रद्धांजली .