महाराष्ट्राचे राजकारण : राष्ट्रपती राजवटीनंतरही सर्वच पक्षांच्या बैठकांना जोर , बहुमत कोणाकडेच नाही अन सरकार स्थापन करण्याचा सर्वांचाच दावा

#WATCH Mumbai: Shiv Sena chief Uddhav Thackeray reacts to a question 'Is the BJP option completely finished?'. Says, "Why are you in such a hurry? It's politics. 6 months time has been given (President's Rule). I didn't finish the BJP option, it was BJP itself which did that…" pic.twitter.com/3pew41hMuF
— ANI (@ANI) November 12, 2019
महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेवर कुठलाही तोडगा न काढता भाजप बरोबरच सेना , राष्ट्रवादी , काँग्रेस यांच्यात बैठकावर बैठक चालूच असल्याचे चित्र दिसत आहे. आज आघाडी बरोबरच नारायण राणे , उद्धव ठाकरे आणि भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकार परिषदा घेऊन आपले काय चालू आहे याची अधिकृत म्हणजे प्रेस समोर जी माहिती देता येईल ती दिली पण “भाजप -सेनेचा महायुतीचा पोपट मेला आहे” या विषयी ना भाजप – बोलते आहे ना शिवसेना…येथे हे विशेष आहे कि , सर्वच पक्षांकडून सरकार स्थापनेचा दावा केला जात आहे. जेंव्हा कि कोणाकडेच सत्ता स्थापनेसाठी हवे असणारे बहुमत नाही.
हा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला तेंव्हा स्वतः उद्धव ठाकरेंनीही या प्रश्नाला बगल दिली. मात्र भाजपा अजूनही संपर्कात आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की रोज नवनवे प्रस्ताव येत असतील तर त्या चर्चेला काही अर्थ नाही. जे काही ठरलं होतं ते ठरलं होतं, मला खोटं ठरवण्यात आलं त्यामुळे माझा संताप झाला असं उद्धव ठाकरे म्हणाले . भाजपाने परवा आम्हाला आघाडीसोबत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. मित्राचा सल्ला आम्ही ऐकला आहे असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
जे काही ठरेल ते जगजाहीर होणार आहे .लपूनछपून नव्हे . महाराष्ट्राचं सरकार चालवणं हा काही पोरखेळ नाही. संख्याबळ आणि पाठिंब्याची पत्रं आमच्याकडे नव्हती. त्यामुळेच आम्ही ४८ तासांची मुदत मागितली होती. मात्र राज्यपालांनी आम्हाला मुदत दिली नाही. राष्ट्रपती राजवट लागल्याने आम्हाला सहा महिन्यांचा कालवाधी दिला आहे. एवढे दयावान राज्यपाल आम्हाला लाभलेच नव्हतेच. वेगळ्या विचारधारेचे प्रश्न एकत्र कसे येणार हा सगळ्यांसमोर पडलेला प्रश्न आहे. भाजपा आणि मुफ्ती मोहम्मद कसे एकत्र आले? पासवान आणि भाजपा कसे एकत्र कसे आले? चंद्राबाबू आणि भाजपा एकत्र कसे आले होते? असे प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केले.
महायुतीविषयी बोलताना त्यांनी पुरुच्चार केला कि , भाजपाने आमच्यासोबत ठरवलेल्या गोष्टी होत्या त्यात अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद ठरवलंच होतं. मात्र भाजपाने मला खोटं ठरवलं आणि ते माझ्यासाठी संतापजनक होतं. हिंदुत्त्व ही आमची विचारधारा आहे. हिंदुत्त्वाला वचनबद्धता हे महत्त्वाचे आहे. देशात रामराज्य आलं पाहिजे असं आम्हाला वाटतं कारण रामराज्य आणावं ही आमची संकल्पना आहे. अरविंद सावंत यांना धन्यवाद द्यायचे आहेत कारण शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक म्हणून मला त्यांचा अभिमान वाटतो असंही उद्धव ठाकरे म्हणाले.