Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Update : खा. संजय राऊत सायंकाळपर्यंत डॉक्टरांच्या निगराणीत , प्रकृती ठीक , तपासण्यांनंतर उद्या सुटी देण्याची शक्यता : आ . सुनील राऊत

Advertisements
Advertisements
Spread the love

https://twitter.com/ANI/status/1193853961389916161

संजय राऊत यांच्यावर रात्री ८ वाजता अँजिओग्राफी केली जाणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवाप्रमुख आदित्य ठाकरे लीलावती रुग्णालयात संजय राऊत यांची भेट घेणार

शिवसेनेचे झुंजार सेनानी आणि माध्यमातील धगधगती तोफ  खासदार संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राऊत यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज आवश्यक त्या तपासण्या केल्यानंतर त्यांना उद्या घरी सोडण्यात येईल अशी माहिती, राऊत यांचे बंधू आणि शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी माहिती देताना सांंगितले.

Advertisements

आमदार सुनील राऊत यांनी सांगितले कि , राऊत यांच्यावर आज रात्री ८ वाजता  एंजिओग्राफी करण्यात येत आहे, मात्र, फार काळजी करण्यासाठी असे काही नाही अशी माहिती डॉक्टरांनी दिली असल्याचे सुनील राऊत यांनी सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात निर्माण झालेला पेच, आणि भाजप-शिवसेनेदरम्यान निर्माण झालेला तणाव यात संजय राऊत अथकपणे कार्यरत होते. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर मोठा ताण होता.

Advertisements
Advertisements

राज्यात सत्तेचा पेच निर्माण झाल्यापासून राऊत सतत पत्रकारांशी बोलत होते. सर्व आघाड्यांवर कार्यरत राहत राऊत यांनी शिवसेनेचे बाजू जोरकसपणे मांडण्याचे काम करीत आहेत. या ताणतणावाच्या परिस्थितीचा मोठा ताण संजय राऊत यांच्यावर होता. गेल्या काही दिवसांपासून राऊत यांना त्रास जाणवत होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हृदयरोग तज्ज्ञ अजित मेनन यांनी उपचार केले आहेत. मात्र, आज पुन्हा आज त्यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!