News Update : आता खटला बाबरी मशीद पाडण्याचा…

अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी दाखल झालेल्या खटल्यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते , मुरलीमनोहर जोशी, उमा भारती, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांच्यासह इतर नेते आरोपी आहेत. या खटल्याचा निकाल देखील लवकरच लागण्याची शक्यता आहे. लखनऊच्या सत्र न्यायालयाने फिर्यादी पक्षाला पुरावे सादर करण्यासाठी २४ डिसेंबर हा शेवटचा दिवस निश्चित केला आहे.
बाबरी पाडल्याप्रकरणी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह यांच्यावर २९ सप्टेंबर २०१९ रोजी आरोप दाखल करण्यात आले. त्यानंतर सत्र न्यायालयाने वारंवार सांगून देखील फिर्यादी पक्षाने कल्याणसिंह यांच्याविरोधात साक्षीदारांना न्यायालयात हजर केले नसल्याने न्यायालयाने त्यांना फैलावर घेतले होते. त्यानंतर ५ ऑक्टोबर २०१९ रोजी सत्र न्यायालयाने सर्व पुरावे २४ डिसेंबर रोजी सादर करण्याचे आदेश दिले आहेत.