MahanayakOnline | ताजी बातमी । Current News Update : भाजपचे राज्यपालांना पत्र , अखेर शिवसेनेवर ठपका ठेवत भाजपचा सरकार स्थापण्यास स्पष्ट नकार

राज्यातील जनतेने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महायुतीला जनादेश दिला होता परंतु शिवसेनेने या जनमताचा अनादर करून साथ दिली नही म्हणून आम्ही आता सरकार स्थापन करणार नाही, असे पत्र आम्ही राज्यपालांना दिले असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आणि शिवसेनेला जर कॉंग्रेस-राष्ट्रवादी बरोबर जाऊन सरकार स्थापन करायचे असेल तर आमच्या शुभेच्छा असे मराठी आणि हिंदीत सांगून पाटील यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली. त्यामुळे भाजपच्या दृष्टीने हा विषय तूर्त संपला असल्याचे दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा तिढा सोडवण्यासाठी अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस आणि इतर महत्वाच्या नेत्यांशी चर्चा केली आणि जे मार्गदर्शन केले . ते आपल्या समोर आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटी बैठक नुकतीच झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, गिरीश महाजन आणि भाजपचे इतर नेत्यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र भाजपने राज्याच्या सत्तेचा तिढा सोडवण्याचे सर्व अधिकार अमित शहा यांना दिले असल्याने या बैठकीत भाजप नेते अमित शहा यांनी पक्षाची भूमिका जाहीर केली आणि काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील राजभवनाकडे रवाना झाले.
राज्यपालांना भेटल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पक्षाची भूमिका पत्रकारांसमोर केली आणि सरकार स्थान करण्यास आम्ही असमर्थ असल्याचे सांगितले. त्यामुळे भाजपने आता सत्ता स्थापनेचा चीनू अत्यंत चलाखीने शिवसेनेच्या कोर्टात टाकला आहे. आता या सर्व प्रकरणात शिवसेना काय भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान आज दुपारीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मढ येथील हॉटेल द रिट्रीटमध्ये जाऊन शिवसेना आमदारांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार असल्याचा पुनरुच्चार केला होता. त्यामुळे सत्ता स्थापनेबाबत भाजप काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे.
भाजपने सत्ता स्थापनेतून माघार घेतल्यानंतर आता कॉंग्रेस-राष्ट्र्वादिंची भूमिका काय असेल ? हे पाहणे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे.