Ayodhya verdict : कोण काय म्हणाले ? आम्ही निकालाचा सन्मान करतो , काँग्रेसचे शांततेचे आवाहन

बहुचर्चित अयोध्या प्रकरणात काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत केले असून देशातील नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. काँग्रेसने म्हटले आहे कि , निकालाचा आम्ही सन्मान करतो.
प्रत्येक भारतीयांचे हे कर्तव्य आहे कि , देशातील बंधुभाव , एकता आणि सौहार्दाची भावना कायम ठेवावी . सर्व धर्म समभाव हा आमच्या देशाचा स्थायी भाव आहे . देशाची परंपरा आणि संस्कृतीचे जतन करणे, एकमेकांच्या धर्माचा आदर करणे आमची सर्वांची जबाबदारी आहे .
काँग्रेस कार्यकर्त्यांना नेत्यांनी सूचित केले आहे विषय अयोध्याच्या निकालाचा असो कि , कलम ३७० चा कोणीही पक्षाच्या विपरीत निवेदन करू नये . या बैठकीला सोनिया गांधी आणि वरिष्ठ नेत्यांनी संबोधित केले.