Ayoddhya Verdict : कोण काय म्हणाले ? मुस्लिम पक्षकारांनी ५ एकर जमीन नाकारावी : खा. असदुद्दीन ओवैसी

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली असून त्यांनी म्हटले आहे की, सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, मात्र अचूक नाही,
निकालावर प्रतिक्रिया देताना त्यांनी पुढे म्हटले आहे की, अयोध्येतील वादग्रस्त २.७७ एकर जागा रामलल्लाची असल्याचा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. सुप्रीम कोर्टाने वादग्रस्त जमीन रामलल्लाची असल्याचा निकाल देत, मुस्लीम समाजाला मशिद बांधण्यासाठी पर्यायी 5 एकर जमीन देण्याचाही आदेश दिला आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर अनेक स्थरातून प्रतिक्रिया येत आहेत.
काय म्हणाले खासदार असदुद्दीन ओवेसी ?
ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डही या निर्णयावर नाराज आहे, माझेही तेच मत आहे. सुप्रीम कोर्ट सर्वोच्च आहे, मात्र अचूक नाही, त्यांच्याही चुका होऊ शकतात. ज्यांनी बाबरी मशिदीला पाडले, त्यांनाच ट्रस्ट तयार करुन मंदिर निर्माणाचे अधिकार कोर्टाने दिला आहे. जर मशिद अस्तित्वात असती तर कोर्टाचा निर्णय काय असता? असा प्रश्नही ओवेसी यांनी उपस्थित केला.
आम्ही आमच्या कायदेशीर अधिकारासाठी लढत होतो. त्यामुळे आम्हाला ५ एकरची भीक नको. त्यामुळे मुस्लीम पक्षकारांनी ही ऑफर नाकारावी. आपला देश हिंदू राष्ट्राच्या दिशेने जात आहे. संघ, भाजप आणि हिंदूत्ववादी लोक याची सुरुवात अयोध्येतून करतील. त्यामुळे या निर्णयाने आम्ही समाधानी नाही. त्याठिकाणी मशिद होती, आहे आणि पुढेही राहिल.