कलगी तुरा : उद्धव ठाकरेंच्या प्रश्नावर सुधीर मुनगंटीवारांची उत्तरे , भाजपचं सत्तेवर नव्हे , सत्यावर प्रेम आहे…

आम्ही राम मंदिरासाठी सरकार कुर्बान केलंय, श्रेय घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही….
महाराष्ट्रातील सत्ता स्थापना राहिली बाजूला आता भाजप -शिवसेनेत चांगलीच तू -तू मै -मै होईल असे दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आज सेनेच्या प्रत्येक वारावर प्रतीवर करून सडेतोड उत्तरे देतांना हेही बजावले तुम्ही ज्या भाषेत बोलता त्या पेक्षाही जबरदस्त भाषेत आम्ही बोलू शकतो पण आम्ही मर्यादा पळून बोलतो . आता त्याचे रूप महाराष्ट्राला दिसणार असल्याचे संकेत सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रश्नांना उत्तरे देऊन दिले आहेत . मुनगंटीवार यांनी म्हटले आहे कि , शिवसेनेने आमच्यावर खोटारडेपणाचे केलेले आरोप अमान्य आहेत. आमचं सत्तेपेक्षा सत्यावर सर्वाधिक प्रेम आहे. त्यामुळे खोटेपणाचा प्रश्नच येत नाही. जनादेशाचा अनादर करून कुणीही भाजपला खोटे ठरवण्याचा प्रयत्न करू नये.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावरून अमित शहा आणि कंपनी खोटं बोलत असल्याचा आरोप केला होता. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार करताना भाजपवरील सर्व आरोप फेटाळून लावले. उद्धव ठाकरे यांनी २४ तारखेला विधानसभेचा निकाल लागल्यावर जनतेला वेठीस धरण्याची घोषणा केली.
दुष्यंत चौटाला आणि उदयनराजे भोसले यांनी विरोधी पक्षात असताना मोदी-शहांवर टीका केली होती. तुम्ही सत्तेत राहून टीका करणारे एकमेव आहात. त्यामुळे दुष्यंत चौटाला आणि उदयनराजेंचा तुम्ही दिलेला संदर्भ लागत नसल्याचा टोला मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
राममंदिराच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले कि , आमच्या पक्षाच्या नावातच पहिलं भारत आहे. त्यानंतर भारतीय जनता आणि शेवटी पक्ष असं आहे. भाजपचं सत्तेवर नव्हे तर सत्यावर प्रेम आहे. त्यामुळे खोटेपणाचा विषय येतोच कुठे? आम्ही राम मंदिरासाठी सरकार कुर्बान केलंय. त्यामुळे अयोध्याप्रकरणी श्रेय घेण्याचा प्रश्नही उद्भवत नाही. जनादेशाचा अनादर करत भाजपला खोटं ठरवू नये, असं सांगतानाच महायुतीला जनादेनश असल्यामुळे आम्ही आतापर्यंत कोणत्याही पर्यायाचा विचार केला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.