योग्य संख्याबळाशिवाय भाजपने सत्ता स्थापन करणे धोक्याचे : सुब्रमण्यम स्वामी

If BJP govt takes oath in Maharashtra without first securing majority support then it will be risky. BJP could lose the vote of confidence in the Assembly
— Subramanian Swamy (@Swamy39) November 7, 2019
महाराष्ट्रातील भाजप सेनेच्या सत्ता पेचा विषयी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनीही आपले मत व्यक्त केले असून , भाजपाने संख्याबळाशिवाय सत्ता स्थापन करणं किंवा शपथविधी पार पाडणं धोक्याचं ठरु शकतं. विधानसभेत बहुमत सिद्ध करताना भाजपाचा विश्वासमत ठरावात पराभव होऊ शकतो असं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेने हक्क सांगितला आहे. अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागितलं आहे त्यामुळे हा पेच निर्माण झाला आहे. अशात संख्याबळ असल्याशिवाय भाजपाने सरकार स्थापन करणं धोकादायक असल्यचं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.
२४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात भाजपाला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या. दोन्ही पक्षांच्या १६१ जागा आहेत. याचाच अर्थ जनेतेने त्यांनाच कौल दिला आहे. अशात शिवसेनेने सत्तेत अर्धा वाटा आणि अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद मागितलं आहे. मात्र अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद असा काहीही ठराव झाला नव्हता असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीच्या दिवशी घरी आलेल्या पत्रकारांना अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं. त्यानंतर या दोन्ही पक्षांमधली चर्चा थांबली. आता सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. अशात सुब्रमण्यम स्वामी यांनी भाजपाने अल्पमतातलं सरकार स्थापन करु नये असा सल्ला दिला आहे.