Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

केंद्रशासित लडाखचे पहिले पोलीस प्रमुख म्हणून महाराष्ट्राचे सतीश खंदारे यांची नियुक्ती

Advertisements
Advertisements
Spread the love

केंद्रशासित प्रदेश म्हणून आजपासून अस्तित्वात आलेल्या लडाखच्या पोलीस प्रमुखपदी सतीश खंदारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सतीश खंदारे हे मूळचे अमरावतीच्या धामणगावचे आहेत. ते ११९५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. लडाखच्या पोलीस प्रमुखपदी पहिली मराठी व्यक्ती नियुक्त झाल्याने महाराष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Advertisements

केंद्रशासनाने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीर आणि लडाख हे दोन स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण केले. आजपासून हे दोन्ही राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात आले आहेत. त्यामुळे खंदारे यांची लडाखच्या पोलीस प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सन १९९५ मध्ये भारतातून ४२५ वी रँक घेऊन आयपीएस झालेले सतीश श्रीराम खंदारे यांनी धामणगाव तालुक्यातील जळका पटाचे येथील अशोक विद्यालयातून इयत्ता दहावीची परीक्षा सन १९८६ मध्ये ८६ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण केली. त्यानंतर धामणगाव शहरातील सेफला हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातून ते बारावी उत्तीर्ण झाले. पुणे येथील सीओयुपी अभियांत्रिकी महाविद्यालयातुन ते १९९२ मध्ये बीई झाले. त्यानंतर १९९५ मध्ये ते आयपीएस बनले. आयपीएस अधिकारी खंदारे हे प्रथम जम्मू काश्मीर कॅडरमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी श्रीनगर परिसरात वेगवेगळ्या जिल्ह्यात जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार सांभाळला.

Advertisements
Advertisements

२००५ मध्ये हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक, २००७ मध्ये पुणे येथे पोलीस उपमहानिरीक्षक, तर सीआरपीएफ नागपूर येथे अतिरिक्त पोलीस महानिरीक्षक, नवी मुंबई भागातील खारघर येथे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल या विभागात पोलीस उप महानिरीक्षक म्हणून सेवा दिली. त्यानंतर पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये दाखल होऊन दोन वर्षे पोलीस महानिरीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!