News Update : महाराष्ट्राचे काँग्रेस नेते नवी दिल्लीत १० जनपथावर पोहोचले , राजकीय परिस्थिती आणि नेता निवडीबाबत चर्चा

Delhi: Maharashtra Congress leaders arrive at 10 Janpath to meet Congress Interim President Sonia Gandhi. pic.twitter.com/jnZ9DpbFcM
— ANI (@ANI) November 1, 2019
महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा करण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेते नवी दिल्लीत १० जनपथवर सोनिया गांधींच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. सोनिया गांधींसोबत होणाऱ्या या बैठकीत महाराष्ट्रासंदर्भात काय निर्णय घेतला जातो याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्रीपद आणि खातेवाटपावरुन शिवसेना-भाजपामध्ये अद्याप एकमत झालेले नसून दोन्ही पक्षांची परस्परांवर कुरघोडी सुरु आहे.
राज्यातील काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी कोणाची निवड करायची यावरही चर्चा होईल. काँग्रेसला यंदा ४४ जागा मिळाल्या आहेत. बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार आणि माणिकराव ठाकरे हे काँग्रेस नेते सोनिया गांधीच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष असून सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष आहे. काँग्रेसने नेहमीच भाजप -सेनेला जातीयवादी संबोधून त्यांच्यापासून आपला पक्ष वेगळ्या विचारधारेचा आहे हे सांगितले आहे त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेसोबत मुळीच जाऊ नये अशी भूमिका सुशीलकुमार शिंदे यांनी घेतली आहे. सुशीलकुमाऱ शिंदे हे माजी केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याच्या भूमिकेला कडाडून विरोध दर्शवला आहे. जनमत मान्य करुन काँग्रेसने विरोधात बसावे असेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस हा सेक्युलर पक्ष आहे काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि शिवसेनेची विचारधारा या दोहोंमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे असं शिंदे यांनी म्हटलं आहे.