Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : बनावट नोटा तयार करणारी टोळी उध्वस्त तीन अटकेत

Advertisements
Advertisements
Spread the love


औरंगाबाद – सेव्हन हिल विद्यानगर परिसरात बनावट नोटा विक्री करणार्‍या दोघांना सापळा लावून पुंडलिक नगर पोलिसांनीअटक केली. तर एकाला आझाद चौक सिडको येथून पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांच्या मदतीने अटक करण्यात आली.त्यांच्या ताब्यातून बोगस१२हजार ४०० रु.,प्रिंटर, कागद असा ८६ हजार ८०० रु.चा ऐवज जप्त केला. या प्रकरणातील एक आरोपी नाशिक मधे असल्यामुळे पोलिसांचे एक पथक नाशिक कडे रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

Advertisements

शेख समरान रशिद (२४) रा. नेहरुनगर सैय्यद सैफ सय्यद असफ(२४),रा. नेहरु नगर  आणि सय्यद सलीम सय्यद मोहम्मदयार (२२).रा. रांजणगाव शेणपुंजी अशी अटक आरोपींची नावे आहेत.गेल्या तीन महिन्यांपासून शहरात जिन्सी पोलिस ठाण्याच्या हद्दीत बनावट नोटा तयार करण्याचे उद्योग सुरु होते.गुरुवारी दुपारी साडेतीन वा. एपीआय घन्नशाम सोनवणे यांनी विद्यानगरात सापळा लावला होता. शेवटी रात्री ८.४५ वा.सय्यद सैफ हा दुचाकीवर विद्यानगरात आला. त्या ठिकाणी सय्यद सलीम ला १००रु. दराच्या नोटा देतांना एपीआय सोनवणे यांनी दोघांना ताब्यात घेत अटक केली. सैफ ने जप्त केलेल्या नोटा आझाद चौकातील शे.समरान रषिद कडून घेतल्याचे सांगितले.

Advertisements
Advertisements

वरील कारवाई पोलिस उपायुक्त डाॅ. राहूल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय घन्नशाम सोनवणे,पोलिस कर्मचारि रमेश सांगळे,मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, प्रविण मुळे दिपक जाधव महिला पोलिस शिपाई माया उगले यांनी पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!