महाराष्ट्राचे राजकारण : प्रफुल्ल पटेल पुन्हा म्हणाले , राष्ट्रवादीचा पाठिंबा कुणालाच नाही…

Praful Patel, Nationalist Congress Party (NCP), in Mumbai: The people's mandate (in #MaharashtraAssemblyElections) is for us to sit in the Opposition. If the situation changes, then we will see. pic.twitter.com/WkZHoDLDeZ
— ANI (@ANI) October 30, 2019
सत्ता स्थापनेवरून भाजप -सेनेत सुंदोपसुंदी चालू असताना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रतिक्रियाही गरज असो नसो चालूच आहेत . निवडणूक आल्या कि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल सक्रिय होतात यावेळीही ते सक्रिय झाले आहेत . २०१४ मध्येही भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याच्या वक्तव्यामुळे ते आजही माध्यमांच्या समरणात आहेत आणि जनतेचाही . महाराष्ट्रात अद्याप सत्ता स्थापनेचे चित्र स्पष्ट झालेले नसल्याचे लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसनेही सत्ता स्थापनेबाबत पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केलीय. ना भाजपला पाठिंबा देणार ना शिवसेनेला, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी स्वतःच हि भूमिका निकालाच्या दिवशीच स्पष्ट केली आहे . हीच भूमिका अजित पवार , नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनीही स्पष्ट केली आहे . आता हीच भूमिका पुन्हा एकदा म्हणजे दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केली आहे .
त्यांनी म्हटले आहे कि , कुठल्याही स्थितीत शिवसेनेला पाठिंबा देणार नाही. तसंच भाजप-शिवसेनेत सुरू असलेली रस्सीखेच हा निव्वळ ‘दिखावा’ आहे. २०१४ ची निवडणूक आणि २०१९ ची निवडणूक पूर्णपणे वेगळी आहे. त्यावेळी सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली. पण आता महाआघीडी आणि महायुती करून निवडणूक लढवली गेली. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देणार नाही.
पवारांच्या नंतर पटेल यांनी पुढे म्हटले आहे कि , जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. तसेच भाजप आणि शिवसेनेने आपल्यातील भांडणं मिटवावीत. भाजप-शिवसेनेत जे काही सुरू आहे हे फक्त नाटक आहे. ते सत्ता स्थापन करतील आणि त्यांनीच सत्तेत यावं. काही मतभेद असतील तर दूर करावेत. आम्ही कुठल्याही पक्षाशी चर्चा करणार नाही. परिस्थिती बदललीच तर त्यावेळी ठरवू.