Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सोमवारी सेनेचा , मंगळवारी भाजपचा तर रविवारी रामदास आठवलेंना मुख्यमंत्री करा : जितेंद्र आव्हाड

Spread the love

शिवसेना-भाजपात सध्या सत्तास्थापनेच्या नात्यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी टीका करताना म्हटले आहे कि ,  “दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचे पाय ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. या नाटकातून दोन्ही पक्षांचं चारित्र्य जनतेला कळत आहे. भाजपा-शिवसेनेची युती झालेली आहे त्यामुळे सत्ता स्थापन करणं त्यांची जबाबदारी आहे. सोमवारी शिवसेनेचा तर मंगळवारी भाजपाचा मुख्यमंत्री करा आणि राहिलेला रविवार आठवले साहेबांना मुख्यमंत्री करा, पण एकदाचं सरकार स्थापन करा”, अशा शब्दांत आव्हाडांनी भाजपा-सेनेला टोला लगावला आहे.

त्याच बरोबर  भाजपा-शिवसेनेचे नेते जनतेला मूर्ख बनवत असल्याचंही आव्हाड म्हणाले.

शिवसेना सत्तास्थापनेत ५०-५० च्या सुत्राप्रमाणे अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची मागणी करत आहे. मात्र भाजपाकडून मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिवसेनेला कोणत्याही प्रकारे असा शब्द देण्यात आला नसल्याचं स्पष्ट केलं. या राजकीय नाट्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड  यांनी टोला लगावला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!