महाराष्ट्राचं राजकारण : भाजपनेते अमित शहा उद्धव ठाकरे यांना बोलणार , दुरावा दूर होईल : गिरीश महाजन

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी लवकरच भारतीय जनता पक्षाचे हायकमांड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना हि माहिती दिली आहे. काहीही झाले तरी सरकार भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षाचेच स्थापन होईल याचा पुनरुच्चारही महाजन यांनी केला आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये निर्माण झालेले वितुष्ट येत्या दोन-तीन दिवसांमध्ये संपुष्टात येईल असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.
दरम्यान आज भारतीय जनता पक्षाची बैठक होत असून या बैठकीच भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाणार आहे. या निवडीनंतर पक्षाचे दिल्लीतील हायकमांड पुढील रणनीती ठरवतील असे महाजन म्हणाले.
भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटले आहे कि, भारतीय जनता पक्षाचे हायकमांड उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे . ही रणनीती ठरवण्याच्या प्रक्रियेत दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही सहभाग असणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सुरु असलेल्या पेचप्रसंग सोडवण्याच्या दृष्टीने चर्चा करणार असल्याचे गिरीश महाजन म्हणाले.
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत सुरू असलेला तणाव येत्या दोन ते तीन दिवसांत संपेल असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला आहे. सरकार एकट्या भाजपचे नसून महायुतीचे असल्याने कोणाला कोणती खाती द्यायची, तसेच प्रत्येकाचे म्हणणे काय आहे, मागण्या काय आहेत यावर चर्चा करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. निकाल लागल्यानंतर फार काळ गेला नाही याकडेही महाजन यांनी लक्ष वेधले आहे. मात्र, आजच्या बैठकीला भाजपचे मित्रपक्षही सहभागी होणार आहेत असेही महाजन म्हणाले. सध्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे संबंध ताणले गेल्याने शिवसेना बैठकीला येणार नाही आणि या ताणल्या गेलेल्या संबंधांबाबत सर्वांनाच माहीत आहे, असेही महाजन म्हणाले.