अखेर कुत्र्याच्या मौतीने मेला कुख्यात दहशतवादी अबू बक्र अल-बगदादी , डोनाल्ड ट्रम्प यांची अधिकृत घोषणा

‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया’ अर्थात आयएस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादीला अखेर ठार मारण्यात आल्याची अधिकृत घोषणा मेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेने हल्ला केल्यानंतर अमेरिकन सैन्याच्या हाती लागू नये म्हणून त्याने अंगातील आत्मघातकी जॅकेटमधील स्फोटकांनी स्वत:ला उडवून दिल्याचे सांगताना ट्रम्प म्हणाले कि , कुत्र्याच्या मौतीने मेला बगदादी.
गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेने आयएस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या अबू बक्र अल-बगदादीचा खात्मा करण्यासाठी आज सकाळी सीरियामध्ये मोठी मोहीम हाती घेतली होती. त्याची माहिती देण्यासाठी त्याच्यावर अडीच करोड अमेरिकी डॉलरचा इनामाची ठेवण्यात आला होता परंतु अमेरिकन गुप्तचरांनी त्याचा ठाव ठिकाण शोधून काढला तेंव्हा बगदादी हा एका भूयारात लपला होता.
अमेरिकेन सैन्याने केल्या आत्मघातकी हल्ल्यात अमेरिकन सैन्याच्या हाती लागू नये म्हणून त्याने आत्मघातकी स्फोटकांनी स्वत:ला उडवून दिले. यावेळी बगदादीसोबत लपलेले त्याची तीन मुलेही या आत्मघातकी हल्ल्यात ठार झाली. डीएनए टेस्ट केल्यानंतर बगदादी मारला गेल्याचे स्पष्ट झाल्याचे ही ट्रम्प यांनी म्हटले आहे. अमेरिकेने सकाळी ही कारवाई केल्यानंतर ट्रम्प यांनी काहीतरी मोठे घडत असल्याचे ट्विट केले होते . त्यानंतर आज संध्याकाळी उशिरा त्यांनी बगदादी मारला गेल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
जगातील दहशतवाद्यांच्या विरोधात अमेरिकेने आयएस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या बगदादीविरोधात मोठी कारवाई हाती घेतली होती . ट्रम्प यांनीही रविवारी ‘काहीतरी मोठं घडलंय,’ असं ट्विट केल्यानं ते काय घोषणा करणार आहेत, याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं होतं. ‘एखाद्या भेकडा सारखं त्याला मारण्यात आलं. त्याला ठार केल्यानं आता जग अधिकच निर्धास्त झालं आहे. गॉड ब्लेस अमेरिका. अबू बकर अल बगदादी कुत्र्याच्या मौतीने मारला गेला. मृत्यूपूर्वी बगदादी रडत होता. आक्रोश करत होता. त्याने भूयारातून पळण्याचा प्रयत्न केला. मात्र अमेरिकन सैन्याने त्याचा पाठलाग केल्याने त्याने स्वत:ला स्फोटकांनी उडवून दिलं,’ असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
बगदादी हा आयएस या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या होता . तो इराक आणि सिरियामध्ये राहायचा . मात्र, तो नेमका कुठे राहतो याबाबत माहिती मिळात नव्हती. बगदाद शहरातील मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला होता. सुरुवातीपासूनच तो कट्टरतावादी विचारसरणीचा होता. इतकंच नाही तर त्यानं स्वतःच्या कुटुंबीयांसाठीही कठोर नियम केले होते . तसंच कुटुंबातील सदस्यांनाही त्यांनी शिक्षा सुनावली होती स्वतःला त्याने खलिफा घोषित केले होते आणि इराक आणि सिरीयात त्याने इस्लामिक राज्याची स्थापना करणार असल्याचे घोषित केले होते.