Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : काय म्हणाले शरद पवार ? सोनिया गांधींनी फोनवरून केले अभिनंदन , वंचित आणि राज ठाकरे यांच्याबद्दलही पहिल्यांदा बोलले पवार

Spread the love

महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर सामनावीर ठरलेले शरद पवार यांनी निकालानंतर काय  वक्तव्य केले हे महत्वाचे आहे . ते यासाठी कि , भाजप सेनेच्या उधळलेल्या घोड्याला रोखण्याचा मोठा पराक्रम केला आहे . हा पराक्रम काय आहे हे मोदी -शहा आणि फडणवीस चांगलेच जाणतात. म्हणूनच कि काय प्रचाराला येऊ न शकलेल्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी खास फोन करून शरद पवार यांचे अभिनंदन केले.

केंद्रातून देवेंद्रला रसद पुरविण्यासाठी आलेल्या नरेंद्र यांचा रथ शरदचंद्राने असा काही अडवला कि , त्याच्या एक एक सभा शरद पवारांनी अतिशय परिश्रमपूर्वक निष्प्रभ केल्या . ऊन , वारा , पावसाचाही त्यांनी तम बाळगली नाही यामुळेच कि काय ” सामनावीर ” हि नवी पदवी त्यांना भलं करण्यात आली . पवारांनी निवडणूक निकालानंतर अनेक मुद्यांवर भाष्य केले . ते म्हणाले कि , निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने पक्षाला भरभरून मतदान दिलं. यामुळेच ‘२२० के पार’ चा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा दावा फोल ठरलाय. सत्तेचा गैरवापर आणि काहीही बोलायचं हे जनतेला पटलेलं नाही. जनतेला सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. साताऱ्याच्या छत्रपतींच्या गादीचा सन्मान आम्ही कायम ठेवू, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार…

राष्ट्रवादी सत्ता पक्षात बसणार काय ? असे विचारले असता पवार म्हणाले कि , जनतेनं  आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिलाय, त्यामुळे  राष्ट्रवादी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनेशी हातमिळवणी करणार असल्याच्या चर्चेला पवार यांनी स्वतःच पूर्णविराम दिला असला तरी पवार आणखी काय वार करतील ? कुठे आणि कधी करतील हे कोणीही सांगू शकत नाही . सध्या तरी त्यांनी  शिवसेनेसोबत जाणार नाहीच. काँग्रेस हा आमचा मित्रपक्ष आहे, अशी स्पष्ट भूमिका  मांडली आहे हे मात्र खरे आहे.

पवार पुढे म्हणतात कि , विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने पक्षाला भरभरून मतदान दिलं. यामुळेच ‘२२० के पार’ चा दावा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा दावा फोल ठरलाय. सत्तेचा गैरवापर आणि काहीही बोलायचं हे जनतेला पटलेलं नाही. जनतेला सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

भाजपच्या प्रचाराविषयी बोलताना मार्मिकपणे शरद पवार म्हणाले कि , पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रात फिरले. त्यांनी महाराष्ट्राचं दर्शन घेतलं. त्यांच्या या महाराष्ट्र दर्शनाचा जनतेला फायदा होईल. मुख्यमंत्री काय किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते काय त्याचं ज्योतिष शास्त्राचं ज्ञान चांगलंय. पण त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नव्हतं. यामुळे वैयक्तीक टीका करून विद्वेषाचं राजकारण करण्याचा प्रयत्न भाजपने केला. तसंच ईडीसारख्या संस्थांचा दुरुपयोग करून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. हे या निवडणुकीतून जनतेनं सत्ताधाऱ्यांना दाखवून दिलं, असं पवार म्हणाले.

३७० कलमला पक्षाचा विरोधच नव्हता. पण त्यावरून विरोधकांना ‘डुब मरो जाओ’ अशी भाषा पंतप्रधानांनी करणं योग्य नाही. ते देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांना शोभत नाही, असा टोला पवारांनी मोदींना लगावला. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली. पण जनतेचा निर्णय आम्ही स्वीकारतो. सत्ता जाते सत्ता येते मात्र जमिनीवर पाय ठेवावे लागतात. या निवडणुकीत किती टोकाची टीका करावी याची सीमा काहींनी ओलांडली होती, असं शरद पवार म्हणाले. पक्षांतर करणाऱ्यांना या निवडणुकी जनतेनं धडा शिकवला. त्यांना जनतेनं पक्षांतरला फारसा पाठिंबा दिला नाही, असं निरीक्षण पवारांनी नोंदवलं.

वंचित आघाडीविषयी बोलताना पवार यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिली ते म्हणाले कि , ज्याचा त्याचा निवडणूक लढवण्याचा निर्णय आहे. वंचित आघाडीने तो घेतला, पण एम आय एम शी त्यांची आलेली युती तुटल्यामुळे त्यांचा तोटा झाला . भाजपला पराभूत करण्याची इच्छा असूनही ते भाजपला पराभूत करू तर शकले नाही पण एकटे लादल्याने त्याचा भाजप -सेनेला फायदा झाला .

राज ठाकरे यांच्या पराभवावर बोलताना पवार म्हणाले कि , राज बोलले चांगले . त्यांच्या सभाही चांगल्या झल्या पण सभेनंतर मतदान करून घेण्यासाठी जे संघटन लागतं ते त्यांच्याकडे नाही , म्हणून त्यांच्या सभांचे रूपांतर विजयात झाले नाही . त्यांनी संघटना मजबुतीने बांधण्याची गरज आहे .

परळीच्या विजयाबद्दल बोलताना ते म्हणाले , या विजयाबद्दल आश्चर्य वाटत नाही. धनंजय मुंडेंचा विजय अपेक्षित होता. आम्ही फिरल्यानंतर ते जाणवलं होतं. ज्या  प्रकारे प्रचार केला गेला भाजपकडून ते जनतेला आवडलं नाही. त्यामुळे त्यांना नाकारलं गेलं, असं शरद पवार म्हणाले.

साताऱ्याच्या विजयाबद्दल सुद्धा खात्री होती हे सांगताना पवार म्हणाले कि , लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंचा पराभव झाला. पण सातारच्या छत्रपतींच्या गादीबद्दल आम्हाला आदर आहे. साताऱ्याला जाऊन  तिथल्या जनतेचा आभार मानण्याचा मी प्रयत्न करणार आहे.  साताऱ्याच्या सभेत ५० हजारांवर लोक आले होते. त्यांना निराश करणं योग्य नव्हतं. यामुळे पाच मिनिटं असो की दहा मिनिटं त्यांच्याशी संवाद साधणं गरजेचं होतं, असं पावसातील सभेबाबत पवार म्हणाले.

सध्या दिवाळीचं वातावरण आहे. यामुळे पक्षाची बैठक दिवाळीनंतर घ्यावी, अशी पक्ष नेत्यांची मागणी आहे. त्यावेळी निवडणुकीतील पराभवावर चिंतन करू. यानंतर मित्र पक्षांसोबतही बैठक घेऊन पुढील रणनिती ठरवणार आहोत, अशी माहिती शरद पवारांनी दिली. निवडणुकीत जनतेनं दिलेलं मतदान पाहता नव्या पिढाला सोबत घेऊन नवीन नेतृत्त्व उभारणार. यासाठी राज्यात ठिकठिकाणी जाऊन व्यापक प्रमाणावर प्रयत्न करणार असल्याचेही  ते म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!