मोदी सरकारने घेतले पाच मोठे निर्णय , बीएसएनएल बंद होणार नाही, किमान आधारभूत किंमतीला मंजुरी

मोदी सरकारने दिवाळीच्या आधी काही मोठे निर्णय घेतले असून शेतकरी आणि सामान्य माणसाच्या हितासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.
१. बीएसएनएल बंद होणार नाही
बीएसएनएलच्या १५ हजार कोटी रुपयांच्या रिव्हायव्हल प्लॅनला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या मते, बीएसएनएल आणि एमटीएनएल बंद केलं जाणार नाही. त्याचबरोबर या कंपन्यांची विक्रीही केली जाणार नाही. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांसाठी आकर्षक व्हीआरएस पॅकेज दिलं जाणार आहे.
२. पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी नियमात बदल
पेट्रोल ट्रान्सपोर्ट मार्केटिंग गाइडलाइनन्समध्ये बदल झाले आहेत. पेट्रोलच्या किरकोळ विक्रीचे नियम सोपे करण्यात आले आहेत. यामुळे पेट्रोल पंप सुरू करण्याची संधी आहे. तुमच्याकडे जास्त पैसे नसतील आणि तुमच्या नावावर जमीन नसेल तर तुम्ही पेट्रोल पंप डिलरशिपसाठी अर्ज करू शकता.
३. रब्बी पिकांसाठी एमएसपी जाहीर
रब्बी पिकांसाठी एमएसपी म्हणजेच किमान आधारभूत किंमतीला मंजुरी मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एमएसपी मध्ये ८५ रुपयांची वाढ झाली आहे. बाजरीच्या एमएसपी मध्येही वाढ झाली आहे.
४. दिल्लीकरांसाठी मोठी भेट
केंद्र सरकारने दिल्लीकरांना मोठी भेट दिली आहे. दिल्लीतल्या अनधिकृत वसाहतींमध्ये राहणाऱ्या ४० लाख लोकांना घराचा मालकी हक्क देण्यात येईल. दिल्लीमध्ये एक हजार ७९७ अनधिकृत वसाहती आहेत.
५. केडर रिव्ह्यू
भारत – तिबेट सीमेवरच्या पोलिसांसाठी केडर रिव्ह्यू करण्यालाही सरकारने मंजुरी दिली आहे. हे काम १८ वर्षांपासून प्रलंबित आहे.