नवीन मोटार वाहन कायदा आल्यानंतर कुत्र्यालाही घातले हेल्मेट

सोशल मीडिया म्हणजे लोकांच्या भावना व्यक्त करण्याचे मोठे ठिकाण आहे . यावर कोण ? कधी ? काय ? टाकेल याचा नेम नाही. सोशल मीडियावर टाकण्यात येणारे फोटो , व्हिडीओ , पोस्ट याची ऑनलाईन आणि प्रिंट मीडियालाही दखल घ्यावीच लागते . असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे . आणि हा फोटो आहे हेल्मेटधारी कुत्र्याचा . वास्तविक देशात नवीन मोटार वाहन कायदा आल्यानंतर या फोटोची अधिक चर्चा होत आहे.
खरे तर सोशल मीडियावर हेल्मेटच्या फायद्याच्या पोस्ट बरोबरच त्याची खाल्ली उडविणाऱ्या पोस्टही केल्या जातात परंतु सोशल मिडीयावरील अनेक नेटकरी या हेल्मेटधारी कुत्र्याच्या प्रेमात न पडले तर नवलच. या फोटोवरअनेक चर्चा सुरु असून युक्तिवाद करण्यात येत आहेत. दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आल्याने सोशल मीडियावर एकीकडे संताप व्यक्त होत असताना, दुसरीकडे मीम्स तयार करुन कायद्याची खिल्ली उडवली जात होती. मात्र यावेळी या कायद्यामुळे होणाऱ्या सकारात्मक बदलांकडे दुर्लक्ष करण्यात आले.
एका दुचाकीवर हेल्मेट घालून प्रवास करत असलेल्या दुचाकीस्वाराच्या मागे बसलेल्या कुत्र्यालाही हेल्मेट असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून नेटकरी या कुत्र्याच्या प्रेमात पडले आहेत. फोटोत कुत्रा मालकाच्या मागे स्कुटीवर हेल्मेट घालून अत्यंत शांतपणे बसल्याचे दिसत आहे. हा फोटो सप्टेंबर महिन्यातील आहे. नवीन मोटर वाहन कायदा लागू करण्यात आल्यानंतर लगेचच हा फोटो व्हायरल झाला होता. या फोटोने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. पुन्हा एकदा हा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या कुत्र्याचे कौतुक होत आहेत. हा फोटो दिल्लीमधील आहे. काहीजणांनी हा कुत्रा दिल्ली वाहतूक पोलिसांच्या वाहतूक सुरक्षा मोहिमेचा भाग असल्याचं मत व्यक्त केले आहे.