Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ : कोण काय म्हणाले ? देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा महायुतीचे सरकार : नितीन गडकरी

Spread the love

महाराष्ट्र आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. अनेक प्रमुख नेत्यांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी नोटला मत देणे चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले.

नागपूरमध्ये मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी गडकरी यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असा विश्वास व्यक्त केला. “या निवडणूकीनंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा-शिवसेना रिपब्लिकन पार्टीच सरकार निश्चितपणे येईल,” असं मत गडकरींनी व्यक्त केले.

नोटाला काहीजण समर्थन करत असल्यासंदर्भात प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी नोटा वापरणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. “जो कोणता उमेदवार असेल पक्ष असेल त्यामुळे एकाला मत द्यायला हवं. मत हे नोटाच्या रुपाने वापरणे किंवा उपलब्ध उमेदवारांपैकी कोणीच नाही असं म्हणणं आजही लोकशाहीमध्ये योग्य आहे असं मला वाटतं नाही,” असं गडकरी म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!