Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad West : भाजप कार्यकर्त्याच्या दुकानावर दगडफेक , सेनेच्या विरोधात बंडखोरी केल्याचा रोष

Spread the love

राज्यात शिवसेना-भाजपमध्ये युती असली तरी औरंगाबाद पश्चिम मतदार संघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आमदार संजय सिरसाट यांच्या विरोधात भाजप उमेदवार राजू शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे भाजपचे अनेक कार्यकर्ते उघडपणे बंडखोर उमेदवाराचा प्रचार करीत असल्याने बराच गोंधळ निर्माण झाल्याने शिवसेनाविरूद्ध भाजप असे चित्र मतदारसंघात दिसत आहे. दरम्यान वाळूज परिसरात शिवसेनेच्या कार्यकर्त्याने भाजप पदाधिकाऱ्याच्या मोबाइल शॉपीवर आज दुपारी दगडफेक केली. एवढेच नाही तर दुकानातील संगणकाची तोडफोड केली. दुकानात केलेली तोडफोड सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली  असून  रवी ऊर्फ दीपक काळे असे दगडफेक करणाऱ्या तरूणाचे नाव आहे.

दगडफेक केल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला असून  पोलिस त्याचा शोध घेत असल्याचे वृत्त न्यूज १८ लोकमतने दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दीपकने भाजप पदाधिकाऱ्याच्या श्री मोबाइल्स (जय भवानी चौक, बजाजनगर) येथील या दुकानावर सोमवारी दगडफेक करत दुकानातील संगणकाची तोडफोड केली. त्याने दोन दिवसांपूर्वी फेसबुक लाइव्ह करून धमकी दिली होती. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल रोडे व पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सदरील पदाधिकारी भाजपचे बंडखोर उमेदवार राजू शिंदे यांचे काम करत असल्याचा रोष मनात धरून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान दगडफेक करणाऱ्या तरुणाशी शिवसेनेचा काही संबंध नाही. स्वतःच्या वैयक्तिक कारणामुळे त्याने हा हल्ला केला असावा असे आमदार संजय शिरसाठ यांनी सांगितले आहे. संबधित कार्यकर्ता शिवसेनेचे उपरणे डोक्याला बांधून आला होता. यावरून हा पूर्वनियोजित कट असून त्याचे मुख्य सूत्रधार कोण याची माहिती घ्यावी, अशी मागणी संतोष चोरडिया यांनी पोलिसांकडे केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!