Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आपलं मंत्रालय : विधासभा निवडणूक २०१९ चे प्रकाशन

Advertisements
Advertisements
Spread the love

‘आपलं मंत्रालय’च्या सप्टेंबरच्या ‘विधानसभा निवडणूक२०१९’च्या विशेषांकाचे प्रकाशन प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांच्या हस्ते आज येथे झाले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, माहिती व जनसंपर्कचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक (वृत्त/माहिती) सुरेश वांदिले, महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत आदी उपस्थित होते.

Advertisements

विधानसभा निवडणुकांचे औचित्य साधून प्रसिद्ध करण्यात आलेल्या या विशेषांकात निवडणूकविषयक विविध माहितीपूर्ण लेखांचा समावेश आहे. आचारसंहिता म्हणजे काय, आचारसंहिता काळात घ्यावयाची काळजी, काय करावे, काय करू नये, निवडणुकीतील सोशल मीडिया, सी-व्हिजील अॅप, निवडणूक चिन्ह, निवडणुकीत वापरली जाणारी शाई, घ्यावयाची खबरदारी, जनजागृती मोहीम, निवडणूक प्रक्रिया याबाबतच्या माहितीपूर्ण लेखांचा यात समावेश आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!