Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोठी बातमी : ठाणे-घोडबंदर रोड, पुष्पांजली रेसिडन्स, फ्लॅट नंबर ३०१ , ५३ लाख ४६ हजार रुपये आणि तुरुंगातील आरोपी “त्या ” फ्लॅटमध्ये !! ठाणे क्राईम ब्रॅंच युनिट १ ची कारवाई

Spread the love

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळातील आर्थिक घोटाळ्या प्रकरणी मागील चार वर्षापासून तुरुंगात असलेला आणि सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार रमेश कदम घोडबंदर रोडवरील एका फ्लॅटमध्ये ठाणे पोलिसांना आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याच फ्लॅटमध्ये आणखीन एक व्यक्ती होता. धक्कादायक बाब म्हणजे या फ्लॅटमधून लाखो रुपायांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्त असतानाही कदम दुसरीकडे गेलाच कसा याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

प्रारंभी  बातमीनुसार ठाण्यातील एका राजकीय नेत्याच्या घरात कोट्यवधींचे घबाड सापडले होते . ठाणे-घोडबंदर रोडवरील पुष्पांजली रेसिडन्समधील ३०१ नंबर फ्लॅटमध्ये ही रोकड सापडली . ठाणे क्राईम ब्रॅंच युनिट १ ने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी निवडणूक अधिकारी चौकशी करत आहेत. मात्र, हा राजकीय नेता कोण, तो कोणत्या पक्षाचा आहे, याबाबत अद्याप समजू शकले असे वृत्त प्रसिद्ध झाले होते. मात्र सविस्तर चित्र समोर आले तेंव्हा या गोष्टीचा मोठा खुलासा झाला कि , या प्रकरणात राजू खरे नामक व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून एकूण ५३ लाख ४६ हजार रुपये रक्कम जप्त केली आहे. ही रक्कम सोलापूर जिल्ह्यात जाणार होती. मात्र, पक्षाने त्या नेत्याला उमेदवारी दिली नाही. त्यामुळे पैसे दुसऱ्या कामाकरता सोलापूरला नेले जात होते.

सोलापूरमधील तो राजकीय नेता  दुसरा तिसरा कोणी नसून न्यायालयीन कोठडीत असलेला रमेश कदम असल्याचे उघडकीस आले आहे.  रेकॉर्डनुसार हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून सध्या त्याला ठाणे मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी त्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय तपासणीसाठी पोलिस बंदोबस्तात मुंबईतील जेजे रुग्णालयात नेण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी येत्या सोमवारी पुन्हा उपचारासाठी घेऊन येन्याबाबत सांगितले. त्यामुळे पोलिस बंदोबस्तात कदमला ठाणे कारागृहात आणले जात होते. मात्र पोलिस एस्कॉर्ट पथकाच्या प्रभारी अधिकारी यांनी कदम याला कारागृहात घेऊन न जाता खासगी गाडीने घोडबंदर रोडवरील ओवळा येथील पुष्पांजली रेसीडन्सी या सोसायटीमधील तिसर्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये आणले होते. याची माहिती पोलिसाना मिळाल्यानंतर पोलिसानी फ्लॅटमध्ये छापा मारला असता याठिकाणी रमेश कदम आणि राजू खरे हे दोघे ५३ लाख ४६ हजार रुपयासह मिळून आले.

दोन हजाराच्या २ हजार ५४८ आणि ५०० रुपायांच्या ५०० नोटा असून खरे याने ही रक्कम आपल्याच मालकीची असल्याचे सांगितले असून विधानसभा निवडणुकीमध्ये उभे राहण्यासाठी त्याने ही रक्कम जमवली असल्याचेही समोर आले आहे. या रकमेबाबत आयकर विभागाला माहिती देण्यात आली असून खरे याला पुढील चौकशीसाठी शनिवारी सकाळी १० वाजता ठाण्यातील आयकर विभागाच्या कार्यालयात कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. ही रक्कम ट्रेझरी मध्ये जमा करण्यात आली आहे.

पोलिस एस्कॉर्ट पार्टीतील अधिकारी आणि कर्मचारी यांची चौकशी करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कदम याची पुन्हा कारागृहात रवानगी केली आहे. रमेश कडांच्या बाबतीत यापूर्वीही पोलिसांकडून अशाच घटना घडल्याचे उघडकीस आलेले आहे तरीही पोलीस त्याच्या जाळ्यात अडकतातच हेच कालच्या घटनेवरून पुन्हा समोर आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!