सरन्यायाधीश पदासाठी रंजन गोगोईनी केली ” या ” मराठी न्यायमूर्तींच्या नावाची शिफारस

सरन्यायाधीश रंजन गोगोई येत्या १७ नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्यामुळे रंजन गोगोई यांनी सरन्यायाधीश पदासाठी न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांच्या नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे. शरद बोबडे हे अयोध्या प्रकरणाची सुनावणी घेणारे खंडपीठाचे दुसरे न्यायाधीश आहेत. रंजन गोगोई यांनी ३ ऑक्टोबर २०१८ रोजी देशाचे ४६ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती. पंरपरेनुसार त्यांनी आपला उत्तराधिकारीम्हणून आपल्यानंतर सेवाज्येष्ठतेनुसार वरिष्ठ असलेले न्यायाधीश बोबडे यांची शिफारस सरन्यायाधीश पदासाठी केली आहे.
शरद बोबडे यांचा जन्म नागपूरचा आहे. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात वकील म्हणून सराव सुरु केला होता. १९९८ मध्ये त्यांची वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती झाली. २००० साली त्यांची उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने त्यांची मुख्य न्यायाधीश म्हणूनही नियुक्ती केली. २०१३ साली त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्याधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.