Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Vidhanabha 2019 : शरद पवारांना प्रत्येक नागपूरकर गुंड वाटतोय , देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार , रोहितचे पार्सल प्रत पाठविण्याचे आवाहन

Spread the love

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कोपरगावमधील प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर तोफ डागली. शरद पवारांना प्रत्येक नागपूरकर गुंड वाटू लागला आहे. त्यांना जळी-स्थळी नागपूरचे गुंड दिसायला लागले आहेत. एका सामान्य नागपुरकरानं त्यांची ही अवस्था करून ठेवलीय, अशा शब्दांत त्यांनी पवारांवर टीका केली.

कोपरगाव मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. यावेळी त्यांनी कलम ३७० आणि पाकिस्तानचा मुद्द्यावर बोलणं टाळून गेल्या पाच वर्षांत भाजप सरकारने केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. त्यांनी शरद पवार यांच्यासह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. तसंच महायुतीच्या उमेदवाराला निवडून द्या, असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोपरगावमधील बंडखोरीवर सूचक वक्तव्य केलं. आमदार स्नेहलता कोल्हे माझ्या भाची आहेत. त्यामुळे मामा म्हणून त्यांच्या पाठिशी उभे राहणे हे माझे कर्तव्यच आहे, असे ते म्हणाले.

रोहित पवार यांचे पार्सल परत पाठवा

लोकसभा निवडणुकीत मा‌वळ मतदारसंघातील मतदारांनी मोठ्या धाडसाने त्यांच्यावर लादलेला उमेदवार पार्थ पवार याला पराभूत केले. त्याचप्रमाणे आता कर्जत-जामखेडकरांनी धाडस दाखवून राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचे पार्सल परत पाठवावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपा-सेना युतीचे उमेदवार प्रा. राम शिंदे यांच्या प्रचारासाठी सिद्धटेक येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. काँग्रेसचे श्रीगोंदा तालुक्यातील कार्यकर्ते राजेंद्र नागवडे, मनसेचे दक्षिण जिल्हा प्रमुख सचिन पोटरे यांच्यासह अनेकांनी यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.

मुख्यमंत्री म्हणाले, लोकशाही धनदांडग्याची नाही. पैशाच्या भरवशावर कोणाला निवडणुका जिंकता येत नाही. तसे असते तर टाटा, बिरला, अंबानी लोकसभेत दिसले असते. येथे थोपलेले नव्हे तर लोकांनी घडविवलेले नेतृत्व चालते. धमक्या देऊन कोणाला सत्तेवर येता येणार नाही. तसा प्रयत्न कोणी केला तर त्यांचा बंदोबस्त करू. मते दिली नाहीत, तर तुमचा ऊस साखर कारखान्यात नेणार नाही, अशा धमक्या कोणी देत असेल तर घाबरण्याचे कारण नाही. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्यांनी ऊस नाही नेला तर आपण या भागात दुसरा साखर कारखाना उभा करू. या निवडणुकीत विरोधकांचा सुफडा साफ होणार आहे. दहा टक्केही जागा त्यांच्या निवडून येणार नाहीत.’

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!