Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ऑनलाईन डिलिव्हरी बॉयकडून ग्राहक महिलेला हिप्नोटाईज करून अतिप्रसंगाचा प्रयत्न

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्लीत ऑनलाइन डिलिव्हरी संबंधातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अॅमेझॉनच्या एका डिलिव्हरी बॉयने महिला घरात एकटी पाहून तिला सम्मोहित करून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. परंतु, महिला वेळीच शुद्धीवर  आल्याने डिलिव्हरी बॉयचा अतिप्रसंगाचा प्रयत्न फसला. महिलेने त्याची यथेच्छ धुलाई करताच त्याने पोबारा केला. कंपनीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

Advertisements

या विषयीची अधिक माहिती अशी कि , नवी दिल्लीतील नोएडा सेक्टर ५८ मध्ये राहणाऱ्या एका महिलेने अॅमेझॉनवरून काही सामानांची खरेदी केली होती. परंतु, या सामानांपैकी काही वस्तू त्या महिलेला परत पाठवायच्या होत्या. त्यासाठी त्या महिलेने अॅमेझॉनकडे पाठपुरावा केला. सामान परत घेण्यासाठी भूपेंद्र पाल या नावाचा डिलिव्हरी बॉय त्या महिलेच्या घरी पोहोचला. त्यावेळी महिला व त्याच्यात सामानावरून वाद झाला. त्यानंतर महिलेने कस्टमर केअरला फोन लावून याची माहिती दिली. त्यानंतर भूपेंद्र तेथून निघून गेला. काही मिनिटांनंतर तो पुन्हा त्या महिलेच्या घरी आला. त्यानंतर पुन्हा एकदा त्या महिलेत व डिलिव्हरी बॉय यांच्यात वाद झाला. डिलिव्हरी बॉयसोबत वाद घालत असताना महिला अचानक बेशुद्ध पडली. डिलिव्हरी बॉयने सम्मोहित (हिप्नोटाईज) करून हा सर्व प्रकार केल्याचा महिलेने आरोप केला आहे.

Advertisements
Advertisements

महिला शुद्धीवर आली त्यावेळी डिलिव्हरी बॉय त्या महिलेसमोर अर्धनग्न अवस्थेत होता. या सर्व प्रकारामुळे महिला प्रचंड घाबरली तिनं आरडाओरड केली. तसेच बाजुला पडलेल्या पडलेल्या व्हायपरने त्या डिलिव्हरी बॉयची धुलाई केली. त्यानंतर आरोपी भूपेंद्र तेथून पळून गेला. त्यानंतर महिलेने अॅमेझॉनकडे तक्रार दाखल केली. अॅमेझॉन कंपनीने या प्रकरणाची गंभीर दखल घेत डिलिव्हरी सर्व्हिस प्रोव्हाईडरवर कारवाई करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ग्राहकांची सुरक्षा ही आमच्यासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे असे प्रकार कंपनी अजिबात खपवून घेणार नाही, असे कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!