Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : शरद पवार यांच्या कुटुंबियांबद्दल हे काय बोलले चंद्रकांत पाटील ?

Spread the love

बहुचर्चित कोथरूड मतदार संघातून निवडणूक लढविणार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या मतदार संघातून आपणच निवडून येऊ असा निर्धार करताना काँग्रेस -राष्ट्रवादीमध्ये माझ्या विरोधात लढण्याची हिम्मत नसल्याने मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवली असल्याचा आरोप करताना विरोधी पक्षावर बरेच तोंडसुख घेतले. न्यूज18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत पाटील बोलत होते.

पाटील पुढे म्हणाले कि , काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते ठाकले असल्याची कबुली त्यांच्याच नेत्यांनी दिली असल्याने काँग्रेस राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने भाजपात येत आहेत . भविष्यात जर पवारांच्या घरातील कुणी भाजपमध्ये येणार असेल तर त्याचं आश्चर्य वाटू देऊ नका अशीही कोपरखळी त्यांनी मारली . ‘

काँग्रेस-राष्ट्रवादीमधील तरुण तडफदार असतील आणि त्यांना भाजपमध्ये येण्याची इच्छा असेल तर आमचे दरवाजे खुलेच राहणार असल्याचंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. दरम्यान, युतीमध्ये मुख्यमंत्री पद कोणाला दिलं यावर विचारलं असता पुढचा मुख्यमंत्री कोण हे अद्याप ठरलेलं नाही. ते निवडणुकांनंतर ठरेल. मात्र, मला मुख्यमंत्री पदाची महत्वकांक्षा नाही असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!