Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Vidhansabha 2019 : एक लाखाहून अधिक सर्व्हिस वोटर्सपर्यंत पोहोचणार विधानसभा निवडणुकीच्या ‘ईटीपीबीएस’ मतपत्रिका

Spread the love

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात १ लाख १७ हजारहून अधिक लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस बलांमधील जवान असलेल्या मतदात्यांची (सर्व्हिस वोटर्स) नोंद झाली असून त्यांच्यापर्यंत ‘इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम’द्वारे (ईटीपीबीएस) ऑनलाईनरित्या मतपत्रिका पोहोचवल्या जाणार आहेत.

भारत निवडणूक आयोगाने सी-डॅकच्या साहाय्याने ‘इटीपीबीएस’ यंत्रणा विकसित केली आहे. लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस बलांमधील जवान (सर्व्हिस वोटर्स) तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आयोगाने ही यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे.

२०१६ मध्ये पुद्दुचेरी विधानसभेच्या नेल्लीथोप मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा इटीपीबीएसचा वापर करण्यात आला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशभरात इटीपीबीएस यंत्रणेचा वापर करण्यात आला. या यंत्रणेच्या माध्यमातून मतपत्रिका ऑनलाइनरित्या सर्व्हिस वोटर्सपर्यंत पोहोचवल्या जातात. लष्करी दले अथवा अन्य सर्विस वोटर्स असलेल्या सेवांमधील नोडल अधिकारी सर्व्हिस वोटर्सचे इटीपीबीएस साठीचे अर्ज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे (डीईओ) पाठवितात. डीईओंनी जिल्ह्यातील सर्व्हिस वोटर्सची यादी संबंधित मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे (इआरओ) पाठविल्यानंतर इआरओ या अर्जावर निर्णय घेतात.

मतदानाच्या साधारणतः १० दिवसापूर्वी सर्व्हिस वोटर्सना इटीपीबी यंत्रणेद्वारे ऑनलाइन पद्धतीने मतपत्रिका पाठविल्या जातात. मतपत्रिकांचा पारंपरिक पद्धतीने पोस्टाद्वारे होणारा मतदारांपर्यंतचा एका बाजूचा प्रवास वाचण्यासह निवडणूक प्रशासनावरील बराचसा ताण कमी होतो. या मतपत्रिका डाऊनलोड आणि प्रिंट काढून मतपत्रिकेवर आपले मत नोंदविल्यानंतर विहित पद्धतीने पोस्टाने पाठविणे आवश्यक असते. टपाली मतपत्रिका पाठविण्यासाठी कोणतेही टपाल तिकीट लावण्याची आवश्यकता नसते.

इटीपीबीएस कुणासाठी

▪ सेवेनिमित्त आपल्या मतदारसंघाच्या बाहेर असलेले लष्करी, निमलष्करी दलातील जवान

▪ केंद्रीय सशस्त्र पोलीस बलांमधील जवान.

▪ निवडणूक कालावधीत राज्याबाहेर कर्तव्यावर असलेले राज्य शासनाच्या सशस्त्र पोलीस बलामधील जवान

▪ जवानांबरोबर निवास करत असलेल्या त्यांच्या पत्नी

▪ परदेशात शासकीय सेवा बजावत असलेले भारतीय शासकीय सेवेतील अधिकारी- कर्मचारी (ओव्हरसीज वोटर्स)

वैशिष्ट्यपूर्ण ‘ईटीपीबीएस’

▪ ईटीपीबीएस यंत्रणेला द्विस्तरीय सुरक्षितता लाभलेली आहे.

▪ इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट डाउनलोड करण्यासाठी ओटीपी आणि पिन नंबर आवश्यक.

▪ युनिक क्यूआर कोडमुळे पोस्टल मतपत्रिकेची सुरक्षितता राखली जाण्यासह नक्कल (डुप्लिकेशन) होणे शक्य नाही.

राज्यात सर्वाधिक सर्व्हिस वोटर्स सातारा जिल्ह्यात

यावर्षी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार राज्यात १ लाख १७ हजार ५८१ इतके सर्व्हिस वोटर्स आहेत. अंतिम मतदार यादीनुसार १ लाख १४ हजार ४९६ पुरुष तर ३ हजार ८५ महिला सर्व्हिस वोटर्स आहेत. सर्वाधिक १२ हजार ६५८ इतके सर्व्हिस वोटर्स सातारा जिल्ह्यात असून सर्वात कमी ३१० इतके पालघर जिल्ह्यात आहेत.

अंतिम मतदार यादीनुसार जिल्हानिहाय सर्व्हिस वोटर्सची संख्या :

नंदूरबार- ४०१, धुळे- २६२१, जळगाव- ७८७८, बुलढाणा- ४५८८, अकोला- ३१८०, वाशिम- १२६०, अमरावती- ३२८२, वर्धा- ८६७, नागपूर- २७७०, भंडारा- १६५४, गोंदिया- १७९९, गडचिरोली- ५१५, चंद्रपूर- १७०८, यवतमाळ- १३७८, नांदेड- २७९०, हिंगोली- ७३२, परभणी- ११३७, जालना-१५३०, औरंगाबाद- २४८९, नाशिक- ८९६६, पालघर- ३१०, ठाणे- १५३२, मुंबई उपनगर- ९८३, मुंबई शहर- ३९३, रायगड- १२००, पुणे- ५७९७, अहमदनगर- १०२५८, बीड- ४५१२, लातूर- २९०२, उस्मानाबाद- २६८४, सोलापूर- ४५३७, सातारा- १२६५८, रत्नागिरी- ८४२, सिंधुदूर्ग- ८०८, कोल्हापूर- ८७५३, सांगली- ७८६७ अशी सर्व्हिस वोटर्सची संख्या आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!