Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : बंडखोरांचे अखेर काय झाले ? कोण मागे आले आणि कोण कायम राहिले ?

Spread the love

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेच आजचा दिवस होता अनेक ठिकाणी सर्वच पक्षाच्या उमेदवारांनी पक्षाच्या अधिकृत उमेद्वारांविरुद्ध बंडखोरी केली होती. हि बंडखोरी होऊ नये म्हणून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शर्थीचे प्रयत्न केले. सायंकाळपर्यंत नेमके चित्र स्पष्ट होणार असले तरी आज दिवसभरात किती बंडखोर उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज परत घेतले याची माहिती पुढील प्रमाणे आहे.

औरंगाबाद : शिवसेना बंडखोर राजू वैद्य यांच्यासह एकूण तेरा जणांकडून औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून अर्ज मागे; भाजप, एमआयएम, सपाच्या उमेदवारासह एकूण ३४ जण रिंगणात

मुंबई: वरळी मतदारसंघातून अमोल निकाळजे (अपक्ष), अंकुश कुऱ्हाडे (अपक्ष) आणि सचिन खरात (अपक्ष) यांचा अर्ज मागे

अहमदनगर: कोपरगाव विधानसभा मतदारसंघात भाजपची बंडखोरी कायम; नगराध्यक्ष विजय वहाडणे तसेच विखे यांचे नातेवाईक जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे रिंगणात

अहमदनगर: शेवगाव मतदारसंघात ७ जणांनी घेतली माघार; ९ उमेदवार राहिले निवडणूक रिंगणात

ठाणे: कल्याणमध्ये बंडखोरी कायम; कल्याण पश्चिमेतून नरेंद्र पवार आणि पूर्वेतून धनंजय बोडारे अपक्ष म्हणून रिंगणात

पुणे: हडपसर मतदारसंघात कोंढव्यातील शिवसेनेचे पदाधिकारी गंगाधर बधे यांनी अर्ज मागे घेतला; काँग्रेसचा कार्यकर्ता खंडू लोंढे यांच्यासह पाच जणांची माघार

पुणे: भोसरी विधानसभा मतदार संघात भाजपचे महेश लांडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे यांच्यात होणार थेट लढत

पुणे: भोसरी मतदार संघातून सहा उमेदवारांची माघार

जागावाटपात रासपकडे असलेल्या दौंड व जिंतूरचे उमेदवार भाजपच्या तिकिटावर लढत असल्यानं महादेव जानकर नाराज

अहमदनगर: कर्जत-जामखेड मतदारसंघातून चार जणांचे अर्ज मागे. निवडणूक रिंगणात उरले १२ उमेदवार; जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे व राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांच्यातील लढतीकडे लक्ष

मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी, सप व अन्य पक्षांच्या महाआघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध

पुणे: भोसरीतून दत्ता साने, जालिंदर शिंदे यांची माघार

पुणे: चिंचवडमधून महायुतीचे बंडखोर राहुल कलाटे रिंगणात कायम; माघार घेणार नसल्याचं केलं स्पष्ट

पुणे: कसबा पेठ मतदारसंघातून शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे निवडणूक लढण्यावर ठाम; महायुतीच्या उमेदवार महापौर मुक्ता टिळक यांच्या अडचणी वाढणार

पुणे: पिंपरी विधानसभा निवडणुकीतून चार बंडखोरांची माघार; शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार व राष्ट्रवादीचे माजी आमदार आण्णा बनसोडे यांच्यात थेट लढत.

औरंगाबाद – पश्चिम मतदारसंघाचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब गायकवाड यांची उमेदवारी मागे

अहमदनगर: नगर शहर मतदारसंघात १२ उमेदवार राहिले निवडणूक रिंगणात. अपक्ष म्हणून अर्ज भरलेले संजय कांबळे व श्रीराम येंडे यांनी घेतला अर्ज मागे

नाशिक: दिंडोरीमध्ये शिवसेनेला बंडखोरी टाळण्यात यश; माजी आमदार रामदास चारोस्कर, धनराज महाले यांची माघार, राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ आणि शिवसेनेचे भास्कर गावित यांच्यात होणार सरळ लढत

नाशिक: नांदगाव: विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष गणेश जगन्नाथ धात्रक यांची माघार

नाशिक पश्चिमच्या भाजप उमेदवार आमदार सीमा हिरे यांच्या अडचणींत वाढ; शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांचा माघार घेण्यास नकार

नाशिक पूर्व मधून काँग्रेस आघाडीचे उमेदवार गणेश उन्हवने यांची माघार

रत्नागिरी जिल्ह्यातील चारही मतदारसंघातून भाजपच्या अपक्ष उमेदवारांची माघार.

अहमदनगर: पारनेर विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे यांची माघार.

अहमदनगर- शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या बंडखोर जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे यांची माघार

पुणे: कसबा मतदारसंघातून माजी महापौर कमल व्यवहारे यांची माघार. काँग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे यांना दिला पाठिंबा

नाशिक: शिवसेनेचे बंडखोर नगरसेवक सुधाकर बडगुजर यांची नाशिक पश्चिम मधून माघार

पुणे: खडकवासला विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार रमेश कोंडे यांची माघार.

पुणे: कोथरूडमध्ये अखेर चंद्रकांत पाटील यांना ब्राह्मण महासंघाचा पाठिंबा, परशुराम सेवा संघाचे सत्यजीत देशपांडे यांचा अर्ज मागे

ठाणे: शहर मतदारसंघात नाट्यमय फेरफार; राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नगरसेवक सुहास देसाई यांचा उमेदवारी अर्ज मागे; आघाडीकडून मनसे उमेदवार अविनाश जाधव यांना पाठिंबा दिला जाण्याची शक्यता

नाशिक: शिवसेनेचे बंडखोर नगरसेवक सुधाकर बडगुजर यांची नाशिक पश्चिम मधून माघार भाजच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात भरला होता अपक्ष अर्ज

नाशिक पूर्वमधून मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक यांची माघार ; मुंबईत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

अहमदनगर : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अनुराधा नागवडे यांची माघार

आपलं सरकार

Click to listen highlighted text!