Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : मनसेची ३२ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

Spread the love

नाही हो म्हणता म्हणता निवडणूक अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असताना पूर्व संध्येला राज ठाकरे यांनी  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची  तिसरी उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी या यादीतून वरळीच्या जागेला वगळण्यात आले आहे . पक्षाच्या वतीने जाहीर केलेल्या आजच्या यादीत एकूण ३२ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.

मनसेने आतापर्यंत तीन उमेदवार याद्या जाहीर केल्यात आहेत. १ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत २७ नावे, काल गांधी जयंतीदिनी जाहीर करण्यात आलेल्या यादीत ४५ नावांचा समावेश होता. त्यानंतर आज तिसऱ्या यादीत ३२ नावे जाहीर करण्यात आली असून आतापर्यंत मनसेचे १०४ उमेदवार विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले आहेत.

दरम्यान आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून स्वत:ची उमेदवारी जाहीर केल्यानंतर राज ठाकरे यांचा मुलगा अमित यांनी आदित्य यांना राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे वरळीतून मनसे उमेदवार देणार कि नाही असा प्रश्न चर्चिला जात आहे. २००९ मध्ये वरळी मतदार संघातून मनसेच्या पारड्यात या मतदारसंघातून ३२ हजार मते पडली होती तर २०१४च्या निवडणुकीत ही मते कमी होऊन ८ हजारवर आली होती. आता यावेळी राज ठाकरे या मतदार संघाबाबत काय भूमिका घेतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागलेले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!