Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चर्चेतली बातमी : बुद्धिजीवींच्या मेळाव्यात हे काय बोलल्या खा. पूनम महाजन ?

Advertisements
Advertisements
Spread the love

निमित्त होते भाजपचे डोंबिवलीचे उमेदवार रवींद्र चव्हाण यांच्यासाठी आयोजित बुद्धिजीवी मेळाव्याचे !! या बुद्धिजीवींच्या मेळाव्यात बोलताना खा. पूनम महाजन यांनी असे काही वक्तव्य केले कि ,  उपस्थितांमध्ये एकाच चर्चा सुरु झाली. त्या म्हणाल्या कि , “डोंबिवलीत दादाच निवडून येणार, बाकी सगळे आदा पादा आहेत !! ”

Advertisements

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत आज भाजपच्या वतीने युवा आणि उद्योजक बुद्धिजीवी वर्गाशी संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात भाषण करताना पूनम महाजन यांनी हे वक्तव्य केलं. डोंबिवलीत दादा म्हणजेच रवींद्र चव्हाणच निवडून येणार, बाकी सगळे आदा पादा आहेत, असं त्या म्हणाल्या.

Advertisements
Advertisements

विशेष म्हणजे बुद्धिजीवी संवाद अशा सोज्वळ नावाखाली आयोजित कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केल्यानं उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. कार्यक्रमानंतर मात्र, त्यांनी काहीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. या कार्यक्रमाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!