ब्राह्मण समाजाच्या समस्या मांडण्यासाठी समाजाच्या उमेदवाराला औरंगाबादेतून उमेदवारी देण्याची मागणी

ब्राह्मण समाजाचा महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज बुलंद करण्यासाठी व ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी समाजाचे नेतृत्व समाजतील बांधवांनीच करायला हवे. आजपर्यंत समाजाच्या मागण्या ज्या की, समाजाचे स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ,पुरोहितांना मासिक मानधन, केजी ते पीजी मोफत शिक्षण तसेच समाजातील भगिनींवर सोशल मिडीया व पुृढार्यांच्या भाषणातून होणारी चिखलफेक, तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न, सरकारी कार्यालयात असणारे दडपण, खेडेगांवात होणारे अत्याचार, तसेच त्यांच्या जमिनी लाटणे या समस्या आजवर कोणत्याही नेत्याने प्रभाविपणे मांडल्या नाहीत.
ब्राह्मण समाजाच्या अधिकारांचे होत असलेले हनन थांबवून त्या विरोधात आवाज उठविण्याकरिता ब्राह्मण समाजातील लोक प्रतिनिधी सभागृहात हवेच. त्याच अनुषंगाने आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांत औरंगाबाद मध्य व पूर्व मतदार संघातील ब्राह्मणांची निर्णायक मतदार संख्या पाहता, राजकीय पक्षांनी ब्राह्मण समाजाच्या उमेदवारालाच उमेदवारी द्यावी. अश्या उमेदवाराच्या पाठीशी परशुराम सेवा संघ खंबीरपणे उभा राहील अशा आशयाचे पत्रक परशुराम सेवा संघ औरंगाबादच्या वतिने भाजपा प्रदेश प्रवक्ते शिरीषजी बोराळकर व शिवसेना उपशहर प्रमुख अनिलजी मुळे यांना देण्यात आले.
या प्रसंगी परशुराम सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष ऊल्हासजी अकोलकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष मोरेश्वरजी सदाव्रते,युवा प्रदेश संघटक केदार पाटील,प्रदेश महिला उपाध्यक्षा उत्तरा अकोलकर, मराठवाडा महिला उपाध्यक्षा अंजुषा कुलकर्णी, युवा मराठवाडा उपाध्यक्ष ऋषिकेश सराफ, जिल्हा मार्गदर्शक सदाशिवजी देशमुख, जिल्हाध्यक्ष विकास गोरवाडकर, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर तुंगार, शहराध्य श्रीहरी चौधरी,शहर कार्याध्यक्ष महेश कुलकर्णी,कोषाध्यक्ष वसंत किनगावकर,शहर उपाध्यक्ष रामचंद्र अंधारकर,दिगंबर पाठक,नारायण पांङव,महिला शहर अध्यक्षा शिल्पा गोखले,महिला शहर कार्याध्यक्षा जयश्री अकोलकर, महिला शहर संघटक सौ.पल्लवी नव्हाङे, महिला शहर उपाध्यक्षा शिल्पा देशपांङे, सुप्रिया जोशी, युवा शहराध्यक्ष अभिषेक इंदापुरकर,यांची उपस्थिती होती.