Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा २०१९ : प्रचंड खलबते झाल्यानंतर सेना-भाजप युतीला हिरवा कंदील, रविवारी घोषणा होण्याची शक्यता

Spread the love

महाराष्ट्रातील विधानसभेच्या  विधानसभेच्या  जागा वाटपावरून निर्माण झालेले भाजप शिवसेनेतील वितुष्ट आता संपले असून भाजप-सेना युती होत असल्याचे वृत्त आहे.

नव्या फॉर्म्युल्यानुसार १४४, १२६ आणि इतर १८ जागांवर लढणार असल्याचं आज झालेल्या भाजपच्या बैठकीत नक्की झाल्याचं सांगण्यात येत आहे.

दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत सोबत घेण्याचं नक्की झालं असून सेनेला १२६ जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर भाजपने १४४ जागांवर लढण्याचं ठरलं असून रिपाइं, रासप, शिवसंग्राम आणि रयत क्रांती सेनेला मिळून १८ जागा सोडण्यावरही या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगण्यात येतं आहे. मात्र सध्या पितृपक्ष सुरू असल्याने रविवारी युतीची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दरम्यान, शिवसेना-भाजप दरम्यान काही जागांची आदलाबदल होणार आहे. शिवसेनेने गोरेगाव विधानसभा मतदारसंघ सुभाष देसाई यांच्यासाठी सोडण्याची अट भाजपला घातली होती. शिवसेनेची ही अट भाजपने मान्य केल्याचंही सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे भाजपच्या नेत्या आणि मंत्री विद्या ठाकूर यांना यंदा तिकीट नाकारण्यात येणार असल्याचंही सांगण्यात येतं.

पुण्यातही शिवसेनेचा एकही आमदार नसल्याने  शिवसेनेसाठी काही जागा सोडण्याची तयारी भाजपने दाखवल्याचं सांगण्यात येतं आहे . शिवसेना आणि मित्रपक्षांनासोबत घेऊनच निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय भाजपने घेतला असून त्यासाठी काही विद्यमान आमदारांना भाजपकडून तिकीट नाकारण्यात येणार असल्याचीही खात्रीलायक माहिती आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!