Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : मंगळसूत्र चोर पोलिसांच्या जाळ्यात

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : मंगळसूत्र हिसकावणा-या मजूराला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली आहे. ऋषीकेश उर्फ बॉबी नवनाथ झिंझुर्डे (वय १९, रा. जयभवानीनगर, तिरुपतीनगर, १३ वी योजना, मुकुंदवाडी) असे मंगळसूत्र हिसकाविणा-या चोराचे नाव आहे. २० ऑगस्ट रोजी घरासमोर शतपावली करत असलेल्या सविता नारायण कुलकर्णी (वय ६२, विद्यानगर, गारखेडा) यांचे रात्री आठच्या सुमारास ऋषीकेश झिंझुर्डे आणि त्याच्या साथीदाराने ४२ हजारांचे मंगळसूत्र हिसकावले होते. याप्रकरणी ऋषीकेश झिंझुर्डेच्या साथीदाराला यापुर्वीच पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली आहे. बुधवारी ऋषीकेश झिंझुर्डे हा सिडको उड्डाणपुलाजवळ फिरत असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांना मिळाली. त्यावरुन पथकातील उपनिरीक्षक विकास खटके, जमादार रमेश सांगळे, मच्छिंद्र शेळके, बाळाराम चौरे, जालिंदर मांटे, शिवाजी गायकवाड, नितेश जाधव व दीपक जाधव यांनी ऋषीकेश झिंझुडेर्ला पकडले. त्याच्याविरुध्द मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात यापुर्वी देखील मंगळसूत्र हिसकाविल्याचे दोन गुन्हे दाखल आहेत.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!