संतापजनक : मागास जातीतील “त्या ” दोन चिमुरड्यांचा दोष इतकाच होता कि , ते उघड्यावर शौचास बसले आणि जमावाने त्यांना निर्दयीपणे मारून टाकले !!

मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात निर्दयतेचा कळस ठरावा अशी संतापजनक घटना घडली आहे. पंचायत इमारतीच्या समोर दोन अल्पवयीन मुले शौचास बसल्याचा कारणावरून गावातील पाच-सहा जणांच्या टोळक्याने या दोन बालकांना केलेल्या अमानुष मारहाणीत या दोन्हीही मागासवर्गातील चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी सांगितले कि , रोशनी (वय १२) आणि अविनाश (वय १०) अशी या दोन्ही चिमुरड्यांची नावे आहेत. या दोन्ही चिमुरड्या मुलांनी पंचायत इमारतीसमोर शौच केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. या ठिकाणी काही पाच-सहा जणांचे टोळके पोहोचले व त्यांनी दोन्ही मुलांना बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या या मुलांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, या हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती सिरसोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. एस. धाकड यांनी दिली.