Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धक्कादायक : बार्शी शहरात एकाच कुटुंबातील चार जणांची आत्महत्या

Spread the love

सोलापूरमधील बार्शी शहरात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अलिपूर रोडवरील ज्ञानेश्वर मंदिर परिसरात हा हादरवणारा प्रकार घडला आहे.

मृतांमध्ये पती, पत्नी, अल्पवयीन मुलगा आणि मुलीचा समावेश आहे. भैरवनाथ शिवाजी कोकाटे यांनी आपल्या कुटुंबीयांसहीत आत्महत्या केली आहे. भरदिवसा ही घटना घडल्यानं शहरात खळबळ उडाली आहे. आपल्या दोन्ही लहान मुलांना विष पाजून त्यानंतर कोकाटे दाम्पत्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पण यामागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

भैरवनाथ कोकाटे (वय ४० वर्ष), मनिषा भैरवनाथ कोकाटे (वय ३६ वर्ष), प्रशांत कोकाटे (वय १५ वर्ष) आणि प्रतीक्षा कोकाटे (वय ११ वर्ष)अशी मृतांची नावं आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!