News Update : Mahanayak | Political : एक नजर : शिवसेना विद्यमान आमदारांची उद्या बैठक; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक

मुंबई: शिवसेना विद्यमान आमदारांची उद्या बैठक; शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक
मुंबई: शिवसेना भाजपची उद्या युतीची घोषणा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार घोषणा : सूत्र
युतीचा निर्णय लवकरच होईल; पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते नरसय्या आडम यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची दाखल केली होती तक्रार
पुणे: चिंचवड विधानसभा मतदारसंघातून जनहित लोकशाही पार्टीच्यावतीने तृतीयपंथी उमेदवार नितीश (नताशा) लोखंडे निवडणुकीच्या रिंगणात
बसपा अध्यक्षा मायावती यांनी राजस्थान कार्यकारणी बरखास्त केली.
अहमदनगर: जामखेड तालुक्यात पालकमंत्री व भाजप नेते प्रा. राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
नागपूर: विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाचे आठ उमेदवार जाहीर
पुणे: भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विजय संकल्प मेळाव्यास उदयन राजे भोसले, शिवेंद्र भोसले अनुपस्थित
अहमदनगर : संस्था चालवायच्या असतात, लुटायच्या नाहीत; अजित पवारांची पक्षसोडून गेलेल्या गयारामांवर टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी घेतली कॉंग्रेस नेत्यांची भेट